मुंबई : जेष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसलाआहे. १२ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने आशा भोसले यांचं निधन झालं. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटल (Breach Candy Hospital) येथे दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावली आणि वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी जीवनप्रवासाची तुलना एका नदीशी करत “संगीत हाच माझा नावाडी आहे” असं म्हटलं होतं. जन्म, नातेसंबंध, संगीताप्रती निष्ठा आणि कर्तव्यांचा उल्लेख करत, शेवटी या प्रवासातून ‘मोक्ष’ मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या शब्दांकडे चाहते आता ‘पूर्वाभास’ म्हणून पाहत आहेत. आशाताईंना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.