मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; वांद्रे-अंधेरी दरम्यान जागेचा शोध घेण्यासाठी म्हाडाला आदेश
मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर, त्यांनी व्यक्त केलेली एक मोठी इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईत राज्य सरकारच्या वतीने ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ स्थापन करण्यात येणार असून, मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर मोहोर उमटवण्यात आली. वांद्रे ते अंधेरी दरम्यान या अकॅडमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.
- शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार, मुंबईत कडेकोट बंदोबस्त मुंबई : भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने ...
- आपल्या आवाजाने सात दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले. वयाच्या १० व्या वर्षी पहिले गाणे गाणाऱ्या आशा यांची गायन कारकीर्द ८२ वर्षांची होती, ज्यात ...
या निर्णयानुसार, संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी ही अकॅडमी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध घेण्याची जबाबदारी म्हाडाकडे सोपवण्यात आली आहे. वांद्रे ते अंधेरी या पट्ट्यात शासकीय भूखंड उपलब्ध करून देऊन तिथे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी ही वास्तू उभारली जाईल.