Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरात सतत गोंधळ घालणाऱ्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एग्झिट

मुंबई : 'बिग बॉस मराठी'चा सीझन ६ (Bigg Boss Marathi 6) आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच फिनाले अगदी जवळ आलं असतानाच आता बिग बॉस मराठीच्या घरात फार मोठा उलथापालथ पाहायला मिळत आहे. एककीडे घराला टॉप ६ स्पर्धक मिळाले आहेत. तर, दुसरीकडे एक सदस्य घरातून बाहेर पडला आहे. संपूर्ण घराला आपल्या तालावर नाचवणारी आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी, घरातली सर्वात चर्चेत असणारी स्पर्धक राखी सावंतनं घराचा निरोप घेतला आहे. 'बिग बॉस मराठी' ६ च्या सीझनमध्ये झळकलेली टीआरपी क्वीन राखी सावंतनं घरातून एग्झिट घेतली आहे.


बिग बॉस मराठी सीझन ६ चा शेवटचा भाऊचा धक्का काल म्हणजेच शनिवारी १० एप्रिल २०२६ रोजी पार पडला. त्यावेळी घरातील एक सदस्य घराबाहेर गेला असून टीआरपी क्वीन म्हणून ओळखली जाणारी आणि घरात आल्यापासूनच सर्वांना आपल्या तालावल नाचवणारी राखी सावंत घराबाहेर गेली आहे.


या आठवड्यात राखी सावंतसोबत विशाल कोटियन, राकेश बापट, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. तर, रेवा कौरासे ही कॅप्टन असल्यामुळे सेफ होती. तसेच, तन्वी कोलतेनं 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे तीसुद्धा सेफ होती. अशातच फिनालेच्या अगदी जवळ येऊन राखी सावंतचा 'बिग बॉस मराठी सीझन ६'चा प्रवास संपला.





'बिग बॉस'च्या घरात गेल्यापासूनच राखी सावंत काही ना काही करुन घरात धुमाकूळ घालत होती. राखीनं आपल्या कट कारस्थानांनी घरातील इतर सदस्यांच्या नाकी नऊ आणलं होतं. कोणती कितीही भांडलं, किंवा कोणी काहीही केलं तरीसुद्धा राखी तेच करायची, जे तिला वाटायचं. गेल्या आठवड्यात तर राखीनं मर्यादाच ओलांडलेली.



भांडणात राखी थेट दिपाली सय्यदच्या वैयक्तिक आयुष्यावर टिका करण्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे घरात तणाव वाढल्याचं पाहायला मिळालेलं. भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुखनं राखीला चांगलंच झापलं होतं. यामुळेच राखीला घरातून एलिमिनेट केल्याचं बोललं जातंय. टीआरपी क्वीन घरातून बाहेर पडल्यानंतर आता बिग बॉसच्या घरात काय बदल होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Asha Bhosle : जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Jana Nayagan Leaked online : थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जना नायकन' ऑनलाइन लीक; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत संताप

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जना नायकन' ऑनलाइन लीक झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ

Shantecha Karta Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डे सर.. लक्ष असू द्या! प्रियदर्शन जाधवची भावूक पोस्ट

मुंबई : मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेलं विनोदी नाटक 'शांतेचं कार्ट चालू आहे' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

Asha Bhosle Heart Attack : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सिनेमातील अजय-अतुलच्या 'छत्रपती अँथम'चा 'हा' व्हिडिओ पाहिलात का ?

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji ) सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Bigg Boss Marathi 6 : रेस टू फिनालेसाठी लढत रंगली, भाऊचा धक्कामध्ये कोणाला धक्का मिळणार आणि कोणाची वर्णी लागणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ ( Bigg Boss Marathi 6 ) आता शेवटच्या टप्प्यात आहे. बिग बॉस मराठीला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत