Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेपूर्वी तणाव शिगेला! अमेरिकेच्या 'त्या' कृतीची आठवण करून देत इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल

अमेरिकेसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या शांतता चर्चेसाठी इराणचे ७१ सदस्यीय शिष्टमंडळ शुक्रवारी (१० एप्रिल) उशिरा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल झाले. इराणच्या वृत्तसंस्थेनुसार, या शिष्टमंडळात वाटाघाटी करणाऱ्यांसोबतच तज्ज्ञ सल्लागार, राजनयिक, सुरक्षा अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींचाही समावेश आहे. या टीमचे नेतृत्व इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत आहेत.


दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स हे देखील या चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील ही अत्यंत महत्त्वाची बैठक आज पार पडणार असून, संपूर्ण जगाचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे.



‘मिनाब-१६८’ विमानाने इराणी शिष्टमंडळाचे आगमन :


इस्लामाबादमध्ये दाखल झालेले इराणचे शिष्टमंडळ ‘मिनाब-१६८’ या विशेष विमानाने आले. वृत्तानुसार, इराणमधील मिनाब शहरातील मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या स्मरणार्थ या विमानाला हे नाव देण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ही शाळा उद्ध्वस्त झाली होती आणि त्यात अनेक निरपराध मुलांचा मृत्यू झाला होता. अमेरिकन तपास यंत्रणांना हा हल्ला चुकून अमेरिकन सैन्याकडून झाला असावा, अशी शक्यता वाटत असून, संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या हल्ल्याची पुन्हा एकदा आठवण करून देत इराण शांतता चर्चेसाठी पाकिस्तानात पोहोचले आहे.



इराणचा अमेरिकेवर अविश्वास कायम :


इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले की, इराण संवादासाठी तयार असला तरी अमेरिका प्रामाणिक करारासह पुढे आली पाहिजे आणि इराणच्या हक्कांचा सन्मान केला पाहिजे. “आमची अमेरिकेबद्दल सद्भावना आहे, पण विश्वास नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.



चर्चा निर्णायक ठरणार ? पाकिस्तानचा मोठा दावा :


पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या चर्चेला “निर्णायक संधी” असे संबोधले आहे. त्यांच्या मते, या बैठकीमुळे मध्य-पूर्वेत कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. “ही केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर संपूर्ण मुस्लिम जगासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सांगत त्यांनी या चर्चेला ऐतिहासिक महत्त्व दिले.



चर्चेपूर्वी ट्रम्प यांची इराणला थेट धमकी :


दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेपूर्वीच इराणवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, सागरी मार्गांवर तात्पुरता दबाव आणण्याशिवाय इराणकडे कोणतेही प्रभावी दबावतंत्र नाही. ट्रम्प यांनी यापूर्वी होर्मुझ सामुद्रधुनीवरून इराणवर कारवाई करण्याची धमकीही दिली होती. “इराणकडे कोणतेही मजबूत पर्याय नाहीत, त्यामुळे त्यांना वाटाघाटींचाच मार्ग स्वीकारावा लागेल,” असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले.


एकूणच, अमेरिका-इराण यांच्यातील ही बैठक केवळ दोन देशांसाठीच नाही, तर जागतिक राजकारणासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता या चर्चेतून तणाव कमी होणार की आणखी वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Middle East War : इराणचा पाठिंबा असो किंवा नसो, अमेरिका होर्मुज खुला करेल - ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज

US-Iran Peace Talks : गालिबाफ यांनी अनोख्या श्रद्धांजलीने अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा

इस्लामाबाद : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाला पूर्णविराम देण्यासाठी कूटनीतिक मार्ग शोधण्याच्या उद्देशाने

West Asia War : पश्चिम आशियातले युद्ध सुरूच राहणार ? शस्त्रसंधीची शक्यता मावळली ?

इस्लामाबाद : इस्रायल,अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध २८ एप्रिल २०२६ रोजी पश्चिम आशियात सुरू झाले. या

attack on Lebanon : ट्रम्पच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच

जेरुसलेम : इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या युद्धविराम सुरू आहे आणि तो पुढे वाढवण्यासाठी चर्चा होणार आहे. दरम्यान,

russia vs ukraine : रशिया आणि युक्रेन दरम्यान ३२ तासांची शस्त्रसंधी

मॉस्को : ऑर्थोडॉक्स इस्टरनिमित्त रशियाने युक्रेनमध्ये ३२ तासांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर केला. शनिवारी

Iran-US-Israel War : इराणला मोठा धक्का! माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन

- अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर प्राणज्योत मालवली इराण अमेरिका युद्धाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणचे