CM Devendra Fadnavis : छगन भुजबळ हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाती लँडिंगबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुरंदरमध्ये मंत्री छगन भुजबळ सुरक्षित आहेत, पण पायलटचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण घटनेची चौकशी नक्की केली जाईल.



नेमकी घटना काय ?


राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगबाबत पुरंदरमध्ये एक धक्कादायक आणि तितकाच थरारक प्रकार समोर आला आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त खानवडी येथे आयोजित कार्यक्रमाला जात असताना, पायलटने हेलिकॉप्टर हेलिपॅडवर न उतरवता चक्क वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरवले. या प्रकारामुळे उपस्थित पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, क्रांतीज्योती महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ हेलिकॉप्टरने येणार होते. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खानवडी गावात त्यांच्या लँडिंगसाठी सर्व निकष पाळून सुरक्षित ठिकाणी हेलिपॅड तयार केले होते.



हेलिकॉप्टर खानवडीच्या आकाशात पोहोचल्यानंतर पायलटने खाली जागा शोधण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला कार पार्किंगची मोकळी जागा दिसली. पायलटने त्या जागेलाच हेलिपॅड समजले आणि थेट पार्किंगच्या दिशेने हेलिकॉप्टर खाली घेण्यास सुरुवात केली. गाड्यांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरत असल्याचे पाहताच तिथे तैनात पोलिसांनी धावत जाऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.



पोलिसांची सतर्कता :


गाड्यांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टरचे चाक टेकताच पोलिसांनी तात्काळ पायलटशी संपर्क साधून ही जागा अधिकृत हेलिपॅड नसल्याचे ओरडून सांगितले. आपली चूक लक्षात आल्यावर पायलटने तात्काळ पुन्हा इंजिनचा जोर वाढवला आणि हेलिकॉप्टर हवेत झेपावले. त्यानंतर, काही अंतरावर असलेल्या नियोजित आणि सुरक्षित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. या सर्व प्रकारात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसले तरी, काही काळ परिसरात प्रचंड गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments
Add Comment

Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची

Pratap Sarnaik : स्कूल बसचे भाडे आता सरकार ठरवणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वाहनाचे लाईव्ह ट्रॅकिंग, पालकांना अलर्ट जाणार मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी

Women's Charter Adhikari : ‘मला महिला सचिव नको’; मंत्र्याच्या हट्टाचा महिला सनदी अधिकाऱ्याला अनुभव

अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा खळबळजनक दावा मुंबई : राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात

Chatrapati Sambhajinagar Police Bharti : सॅण्डलवर धावत ५ किमी पूर्ण; जिद्दीला दाद देत अधिकाऱ्यांनी गिफ्ट केले.....

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान एका उमेदवाराची जिद्द आणि मेहनत

पाषाण तलावात हजारो माशांचा मृत्यू; पुणे महापालिका आयुक्तांचा दणका; ४ अधिकारी निलंबित, मुख्य अभियंत्याला नोटीस!

पुणे : पुण्यातील निसर्गरम्य पाषाण तलावात (Pashan Lake) मोठ्या प्रमाणावर मासे आणि जलचरांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना

Govt Job : २३ वर्षांची प्रतीक्षा संपली! महिला व बाल विकास विभागात ८,६६९ पदांची मेगाभरती; आदिती तटकरेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागात तब्बल दोन दशकांनंतर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या २३