Bmc News, Vashi Gateway : वाशी प्रवेशद्वाराला मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव प्रतिष्ठानने केली महापौरांकडे मागणी

मुंबई : मुंबईच्या महापौरांच्या संकल्पनेतून मुंबईतील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि घड्याळ बसण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. यातील वाशी प्रवेशद्वाराला मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणी जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानच्यावतीने महापौरांकडे करण्यात आली आहे.


मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी करण्याची संकल्पना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मांडली. त्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्प कामाला गती देण्यासाठी मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन केंद्राचा विकास हा मुंबईची जागतिक ओळख स्थापन करणारा, मुंबईकरांच्या अस्मितेशी जोडलेला आणि मुंबई महानगरपालिकेच्या महसुलात भर टाकणारा प्रकल्प असल्याने महापौरांनी सर्व ठिकाणी जात याचा आढावा घेतला. महापौरांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या चार पैकी एक असलेल्या मुंबईतील वाशी प्रवेशद्वाराला मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ नाना शंकरशेट यांचे नांव देण्याचे निवेदन प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट देऊन केली.



यावेळी महापौरांचा शाल, पुष्पगुच्छ, नानांची प्रतिमा, नानांचे चरित्र देऊन प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने सत्कार केला. यावेळी महापौर निधीसाठी धनादेशही देण्यात आला. यावेळी महापौर रितू तावडे यांनी आस्थेने चौकशी करून सकारात्मक प्रतिसाद दिला.त्याप्रसंगी उपमहापौर संजय घाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेन्द्र शंकरशेट, दैवज्ञ परिषदचे अध्यक्ष डॉ गजानन रत्नपारखी, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, सरचिटणीस,माजी नगरसेवक ॲड मनमोहन चोणकर. सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, सदस्य अश्विन उपाध्याय, दिलिप मालणकर उपस्थित होते.



दरम्यान वाशी येथील प्रवेशद्वाराला नाना शंकरशेट यांचे नांव देण्याची ठरावाची सूचना नगरसेवक हरी शास्त्री यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सरचिटणीस, माजी नगरसेवक ॲड मनमोहन चोणकर यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Megablock Update : मुंबईकरांना रविवारी पुन्हा मेगाब्लॉकचा फटका; प्रवाशांची मोठी गैरसोय

मुंबई : मुंबईतील लोकल प्रवाशांना रविवारी पुन्हा एकदा मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेकडून विविध

Ashok Kharat Case, Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका?

 भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी तक्रार; बीडमधील व्यक्तीचा 'एसआयटी'कडे खळबळजनक दावा मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक

Bmc News : वांद्र्यातील नवपाडा, घासबाजारमधील तुंबणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा

दक्ष सहायक आयुक्तांमुळे रेल्वेला करावी लागली कल्व्हर्टची सफाई मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात

BMC : महापालिका आयुक्त तपासणार आता प्रत्येक अधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला गती देतानाच

gig worker : गिग आणि डिलिव्हरी कामगारांची सक्त पडताळणी

मुंबई : महाराष्ट्रातील स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीटसारख्या असंख्य ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आणि

crop registration : प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता