Ashok Kharat Case, Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका?

 भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी तक्रार; बीडमधील व्यक्तीचा 'एसआयटी'कडे खळबळजनक दावा


मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता अनपेक्षित आणि धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने एक गंभीर तक्रार दाखल केली असून, त्यात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.


अशोक खरात याच्याविरोधात लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर 'एसआयटी'मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या तपासादरम्यान बीडमधील एका व्यक्तीने थेट 'एसआयटी'कडे धाव घेत ही लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीतील आरोपांमध्ये नेमकी तथ्य किती आणि राजकीय खोडसाळपणा किती, याची पडताळणी करण्याचे मोठे आव्हान आता तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणाला आता राजकीय पदर प्राप्त झाल्याने पोलीस वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.



पीडितांच्या तक्रारींचा ओघ वाढला


अशोक खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आणि धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे आरोप आहेत. 'एसआयटी'ने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर दररोज तक्रारींचा ओघ वाढत असून, त्यात आर्थिक फसवणुकीसह कौटुंबिक वादांचेही अनेक धागेदोरे समोर येत आहेत. खरातवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले असून, सध्या तिसऱ्या गुन्ह्याच्या चौकशीवर विशेष भर दिला जात आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली त्याने दिल्याचेही समजते.



'माझं मरण इथेच...'; खरात मानसिकदृष्ट्या खचला


सततची चौकशी आणि गुन्ह्यांचा वाढता आकडा यामुळे अशोक खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "मी इथून बाहेर पडेन असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे," असे उद्गार त्याने चौकशीदरम्यान काढल्याचे समजते. खरातने विणलेले जाळे नेमके किती खोलवर आहे, हे शोधण्यासाठी 'एसआयटी' आता तांत्रिक पुराव्यांची मदत घेत आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे