नाशिक : नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या काळ्या कारभारावर पोलिसांनी अखेर हातोडा टाकला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या राबवलेल्या 'स्पेशल ऑपरेशन'मध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. कंपनीतील उच्चशिक्षित तरुणींना करिअरच्या प्रगतीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर विशिष्ट धर्माची संस्कृती लादून त्यांचे धर्मांतर करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात निष्पन्न झाला आहे. पीडित तरुणी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी धाडसी पाऊल उचलत या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महिला अधिकारी वेषांतर करून कंपनीत घुसल्या अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, या महिला अधिकारी कर्मचारी म्हणून कंपनीत दाखल झाल्या होत्या. एका महत्त्वाच्या मीटिंग दरम्यान आरोपींनी महिलांशी अश्लील चाळे आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली, जे या पथकाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. पुरेसा पुरावा मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या मोहिमेत पोलिसांनी ४० हून अधिक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. नाशिक पोलिसांच्या या चोख नियोजनामुळे आणि धाडसी कारवाईमुळे आयटी क्षेत्रातील हे मोठे रॅकेट अखेर उद्ध्वस्त झाले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून होर्मुज जलडमरूमध्य मार्गे होणाऱ्या तेल वाहतुकीत अडथळे निर्माण केल्याबद्दल ...
अश्लील वर्तन....
या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी चित्रपटालाही मागे टाकेल असे अत्यंत गुप्त आणि धाडसी ऑपरेशन राबवून मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्या आहेत. काही पीडित महिलांनी कंपनीतील छळाबाबत तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी थेट छापा न टाकता पुरावे गोळा करण्यासाठी एक विशेष सापळा रचला. ७ वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले. या महिला अधिकाऱ्यांनी सॉफ्टवेअर कामाचे निमित्त काढून कंपनीत प्रवेश केला. तिथे काम करत असताना, कंपनीतील काही वरिष्ठ कर्मचारी आणि टीम लीडर्स महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि अश्लील वर्तन करत असल्याचे या महिला अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. स्वतःच्या डोळ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर, "आम्ही पोलीस आहोत," असे सांगत या पथकाने तातडीने संबंधित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईनंतर आतापर्यंत ९ पीडित महिलांनी धैर्याने पुढे येत गुन्हे दाखल केले आहेत.
तपासातून उघड झाले आहे की, संबंधित आयटी कंपनीत केवळ कामाचेच नव्हे, तर तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉशिंग करण्याचे केंद्र सुरू होते. कंपनीतील काही टीम लीडर्स आपल्या पदाचा गैरवापर करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे मानसिक परिवर्तन करायचे. हा केवळ वैयक्तिक शोषणाचा भाग नसून त्यामागे धर्मांतराचा एक मोठा मास्टरगेम असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये केवळ महिलांनाच लक्ष्य केले गेले नाही, तर एका तरुणाचेही बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असून, आतापर्यंत दोन विवाहित महिलांसह एकूण आठ तरुणींनी लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या तक्रारी दिल्या आहेत, ज्यावरून ९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून पीडितांवर त्यांच्या मूळ धर्माचा त्याग करून एका विशिष्ट धर्माची संस्कृती स्वीकारण्यासाठी सतत मानसिक दबाव टाकला जात होता. करिअरचे स्वप्न घेऊन आलेल्या तरुणांच्या हतबलतेचा फायदा घेत, त्यांच्यावर धार्मिक विचार लादण्याचे हे मोठे रॅकेट नाशिक पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रातील रॅकेटचा पर्दाफाश
कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत तांत्रिक आणि गोपनीय पद्धतीने तपास चक्रं फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी संबंधित कंपनीतील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि महत्त्वाचा डिजिटल डेटा आपल्या ताब्यात घेतला आहे. या तांत्रिक पुराव्यांमुळे रॅकेटचा पर्दाफाश करणे सोपे झाले. नाशिक पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे राज्यातील एका मोठ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, यामागे आणखी कोणते मोठे चेहरे आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
६ आरोपी अटकेत, पुण्यातून महिला HR ला बेड्या
या प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी या रॅकेटमधील ६ मुख्य आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका महिला ह्युमन रिसोर्स (HR) अधिकाऱ्याचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या या महिला एचआरला पोलिसांनी पुण्यातून शोधून काढत ताब्यात घेतले आहे. पीडित महिलांनी वारंवार कंपनीत तक्रारी केल्या होत्या, मात्र या महिला एचआरने त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. गुन्हेगारांना पाठीशी घातल्याच्या ठपक्यावरून पोलिसांनी तिला या प्रकरणात सहआरोपी केले आहे. अटकेतील सर्व सहा आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.