उत्तर प्रदेशातील मथुरा (Mathura) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीमध्ये (Yamuna River) पुलाला धडकून बुडाली. या अपघातात ९ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २२ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमार, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू करत २२ प्रवाशांना वाचवण्यात यश आले. तसेच एनडीआरएफ (National Disaster Response Force) आणि SDRF च्या पथकांनीही मदतकार्य हाती घेतले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे ...
मथुरा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुरेश चंद रावत यांनी घटनास्थळी भेट देत सांगितले की, सर्व भाविक वृंदावन (Vrindavan) येथील देवराहा बाबा मठात जात होते. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.