किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात
मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये सध्या ३५ टक्के पाणी साठा असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणी साठा चांगल्याप्रकारे असला तरी प्रत्यक्षात पावसाळ्याचे गणित पाहता मुंबई महापालिकेला पाणीकपात करण्याची गरज भासणार आहे. त्यातच राज्य शासनाने महापालिकेला ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिल्यामुळे येत्या १ मेपासून मुंबईत किमान १० टक्के कपात करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे येत्या महिन्यात पुढील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्यादृष्टीकोनातून ही कपात जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (वॉर रुम) स्थापन ...
- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईकरांना सध्या पाण्याची समस्या भेडसावत ...
मागील वर्षी पाण्याचा साठा कमी झाल्यानंतरही शासनाने भातसा धरणातील अतिरिक्त पाणी देण्याची तयारी दर्शवल्यामुळे पाणीकपात करण्यात आली नव्हती. परंतु यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची भीती असल्यामुळे शासनाकडून भातसाचेही अतिरिक्त पाणी मिळण्याची शक्यता नाही. याउलट महापालिकेला आपल्या धरणातील राखीव पाणी साठाही वापरण्याची गरज भासणार आहे. याचीही मंजुरी प्राप्त करून या पाण्याचा वापर करण्याची रणनिती आखली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना येणाऱ्या काळात किमान दहा टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागेल,असा अंदाज वर्तवला जात आहे.
दिनांक ९ एप्रिलच्या दिवसापर्यंतचा पाणी साठा
सन २०२६ : ५ लाख २० हजार ९९८(३५.९८)
सन २०२५ : ४ लाख ७० हजार १०७(३२.४८)
सन २०२४ : ३ लाख ९० हजार ३४७(२६.९८)