Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा


मुंबई : पालघर जिल्ह्याच्या सुरक्षेच्या आणि प्रशासकीय रचनेच्या दृष्टीने राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोच्या पालघर युनिटसाठी वसई तालुक्यात हक्काची जमीन मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्याने आता पालघरमध्ये 'आयबी'चे स्वतंत्र कार्यालय आणि कर्मचारी निवासस्थाने उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील मौजे भुईगांव खु. येथील स.नं./ग.नं. २०४/अ/१ मधील एकूण क्षेत्रापैकी १२०० चौ. मी. शासकीय जमीन या प्रकल्पासाठी प्रदान करण्यात आली आहे. ही जमीन 'भोगवटादार वर्ग-२' या धारणाधिकाराने इंटेलिजन्स ब्युरो, मुंबई यांना देण्यात आली असून, यासाठी प्रचलित वार्षिक दरपत्रकानुसार जमिनीची किंमत आकारण्यात आली आहे.


पालघर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने तेथे गुप्तचर विभागाची यंत्रणा अधिक सक्षम असणे आवश्यक होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून जमीन वाटपाच्या प्रक्रियेला गती दिली आणि आज दि. ९ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.


जमीन देताना शासनाने काही अटी घातल्या आङेत. त्यानुसार या जमिनीचा वापर केवळ कार्यालय आणि निवासस्थाने बांधण्यासाठीच करणे बंधनकारक राहील. जर मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर थांबवला, तर ती जमीन महाराष्ट्र शासनास विनामोबदला परत करावी लागेल.

Comments
Add Comment

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस

Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न बीड : म्हसोबावाडी (ता.