उन्हाळ्यात तीव्र ऊन, आर्द्रतेमुळे चेहरा काळवंडतो. कडक उन्हामध्येही चेहरा फ्रेश राहावा, चेहऱ्यावरची चमक कायम राहावी यासाठी कॉफी स्क्रब हा अतिशय उत्तम पर्याय आहे. प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि मृत त्वचेच्या पेशींमुळे त्वचा निस्तेज आणि खडबडीत होऊ शकते. कॉफी बॉडी स्क्रबमुळे त्वचा उजळून येईल. हा स्क्रब उन्हाळ्यात खुप फायदेशीर ठरेल.
कॉफी आणि नारळ तेल
कॉफी आणि नारळ तेलचा स्क्रब हा सर्वात सोप्या आणि प्रभावी स्क्रबपैकी एक असून नारळ तेल त्वचेला खोलवर आर्द्रता देतं आणि कॉफी मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतं. दोन मोठे चमचे खोबरेल तेलात अर्धा कप कॉफी पावडर मिसळा. हे मिश्रण हळुवारपणे संपूर्ण शरीरावर चोळा. हा स्क्रब कोरड्या त्वचेला आराम देतो आणि त्वचेला मऊ बनवण्यास उपयुक्त ठरतो.
कॉफी आणि ब्राऊन शुगर
कॉफी आणि ब्राऊन शुगरचा स्क्रब त्वचेवर मृत पेशींचा थर साचला असेल, तर हा स्क्रब उत्तम आहे. साखरेचे कण त्वचेला खोलवर स्वच्छ करतात, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी दिसते. हे स्क्रब तयार करण्यासाठी समान प्रमाणात कॉफी आणि ब्राऊन शुगर घेऊन त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल घाला.
कॉफी आणि मध
कॉफी आणि मधाचा स्क्रब मधात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि डाग कमी करण्यास मदत होते. त्वचेचा रंग एकसमान करण्यासाठी आणि नैसर्गिक चमक आणण्यासाठी हा स्क्रब उत्तम आहे. २ चमचे कॉफी पावडरमधे एक चमचा मध आणि थोडं गुलाबजल मिसळून हे स्क्रब तयार करा.
कॉफी आणि दही
कॉफी आणि दही हा स्क्रब उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल, तर उत्कृष्ट ठरेल. दही आणि कॉफीचं मिश्रण खूप प्रभावी ठरतं. दह्यातील लॅक्टिक ॲसिड काळवंडलेपणा दूर करतं, तर कॉफीमुळे त्वचा ताजीतवानी वाटते. अर्धा कप दह्यामधे ३ चमचे कॉफी पावडर मिसळा. हे मिश्रण शरीरावर लावून, दहा - पंधरा मिनिटं तसेच राहू द्या आणि नंतर स्क्रब करून काढून टाका.
कॉफी आणि दालचिनी
कॉफी आणि दालचिनीचा स्क्रब कॉफी आणि दालचिनीचं मिश्रण शरीराच्या ज्या भागांवर अतिरिक्त चरबी किंवा सेल्युलाईट आहे, त्यांच्यासाठी उत्तम आहे. हे मिश्रण बनवण्यासाठी, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि थोडं बदामाचं तेल कॉफीत मिसळा.
स्क्रबिंग करताना नेहमी गोलाकार पद्धतीनं हळुवारपणे स्क्रब करा. बॉडी स्क्रब आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच वापरा. अतिवापरामुळे त्वचा सोलली जाऊ शकते. मॉइश्चरायझर म्हणून स्क्रबिंगनंतर लोशन किंवा बॉडी बटर लावा. कोणतीही एलर्जी असल्यास योग्य ती काळजी घ्यावी.