Gold Silver Price : युध्दविरामाच्या अवघ्या २४ तासांतच सोन्या - चांदीच्या दारात मोठी घसरण

सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली गेल्याने सराफा बाजारात आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काल अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र अवघ्या २४ तासांतच दरात झालेल्या या घसरणीमुळे बाजारातील अनिश्चितता पुन्हा वाढली आहे.


आजच्या व्यवहारात सोन्याच्या दरात सुमारे २,१०० रुपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५१,४८० रुपयांवर आला आहे. तसेच ८ ग्रॅम सोन्याचा दर १,८७२ रुपयांनी घसरून १,२१,१८४ रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरातही २,१५० रुपयांची घसरण झाली असून तो १,३८,८५० रुपयांवर आला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर १,७६० रुपयांनी कमी होऊन १,३६,६१० रुपयांवर स्थिरावला आहे.


सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात तब्बल ७,००० रुपयांची घट झाली असून, सध्या एक किलो चांदीचा दर २,५५,००० रुपयांवर आला आहे. दरातील या अचानक बदलामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


तज्ज्ञांच्या मते, काल दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली, ज्यामुळे आज दरांवर दबाव आला. तसेच शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतरही इराणकडून सावध भूमिका घेतली जात असल्याने जागतिक पातळीवर अनिश्चितता कायम आहे.


जागतिक घडामोडी, गुंतवणूकदारांची बदलती भूमिका आणि बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सध्या मोठे चढ-उतार सुरू आहेत. येत्या काही दिवसांतही हा कल कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक