मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. याचबरोबर घरात राखी सावंतनं एन्ट्री घेतल्यानंतर स्पर्धकांमध्ये वाद आणखीनच वाढलेले दिसत आहेत. प्रत्येक स्पर्धकामध्ये राखीनं भांडण लावण्याचा प्रयत्न केला. या शोमध्ये राखीनं रुचिताच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले. अशातच आता राखीनं मर्यादेची पातळी ओलांडली असून दीपाली सय्यदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नको ते बोलली आहे.
दीपाली आणि राकेश चांगले मित्र असून हे राखीला कायम खटकत आलंय. राखी आणि राकेश एकत्र बसलेले असतात. त्यावरून राखी दीपाली आणि राकेश यांना डिवचते. 'एक सिंगल मुलगा आणि लग्न झालेली मुलगी' असं राखी म्हणते. 'लाज वाटायला पाहिजे तुला, लग्न केलेल्या बाईसोबत...' असं राखी राकेशला म्हणते. यावरून राखी, दीपाली आणि राकेश यांच्यात वाद होतो. पुढे राखी दीपालीला म्हणते, 'तू घाण केलीस' दीपाली राखीला म्हणते, 'मी नाही तू घाण केलीस. माझ्या लग्नाला २६ वर्षे झालेली आहेत. मी माझं लग्न टिकवलंय. तुझ्यासारखं नाही...इकडे तिकडे तोंड काळं कर, असं करणाऱ्यातली नाहीये
यावेळी दीपालीला राग अनावर होतो. तर राखी मुद्दाम राकेशवरून दीपालीला बोलते. 'हिचं राकेशवर प्रेम आहे' असं राखी म्हणते. पुढे राखी दीपालीला म्हणते, 'अफेअर करते. लग्न झालंय तरी हे करते. तुझ्या मनात घाण आहे. लग्न झाल्यानंतरही असं कसं वागतात.' दीपालीही त्यावरून राखीला सुनावते. दीपालीला अश्रू अनावर होतात. त्यानंतर राकेश दीपालीला समजावतो.
अशातच आता कलर्स मराठीनं शेअर केलेल्या 'बिग बॉस मराठी ६'च्या प्रोमोमध्ये दीपाली रडताना दिसतेय. दीपाली म्हणतेय, 'संसार टिकवून ठेवणं, त्याला पिंच करायला नव्हतं पाहिजे तिने, बाकी सगळं सहन केलं असतं मी.' यावरून राकेश राखीला समजवायला जातो आणि दीपालीला सॉरी म्हणायला सांगतो. त्यामुळे आता राखी दीपालीची माफी मागेल का? की आणखी नवा राडा करेल, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल.