Dhurandhar 2 : अखेर 'धुरंधर २' सिनेमाबाबत दीपिकानं सोडलं मौनं, ट्रोल करणाऱ्यांना म्हणाली....

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई केली आहे. अशातच सोशल मीडियावर एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं होतं. रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोणनं या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर मौन बाळगल्यानं तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात होतं. पण, अखेरआता दीपिकानं ट्रोलर्सना आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे.


'धुरंधर: द रिव्हेंज'रिलीज होऊन आता ३ आठवडे पूर्ण होत आले असून या काळात अनेक कलाकारांनी या सिनेमाचं आणि रणवीरचं कौतुक केलं, पण दीपिकानं याबाबत एकही पोस्ट शेअर केली नव्हती. यावरून तिला सोशल मीडियावर भङयंकर ट्रोल केलं गेलं.


एका व्हायरल पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, दीपिकानं ५०० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या सिनेमाला 'सायलेंट ट्रीटमेंट' दिली आहे. तिनं सिनेमाच्या प्रीमियरला जाणं टाळलं आणि सासू-सासरऱ्यांसोबत सतार वादनाच्या कार्यक्रमाला जाणं पसंत केलं.


या पोस्टवर कमेंट करताना दीपिकानं लिहिलं की, मित्रांनो, मी हा सिनेमा तुमच्या सर्वांच्या आधी पाहिला आहे, आता सांगा जोक कुणावर झाला?


दीपिकानं सोशल मीडियावर धुरंधर २ बद्दल पोस्ट केली नसली, तरी ती रणवीरच्या यशात सहभागी असल्याचं दिसून आलं आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ती रणवीर आणि तिचे सासरे जगजित सिंग भवनानी यांच्यासोबत मुंबईतील प्रसिद्ध कॅफे आणि डोसा सेंटरमध्ये डिनरसाठी जाताना दिसली होती.




दीपिका पादुकोणनं यापूर्वी डिसेंबरमध्ये 'धुरंधर'च्या पहिल्या भागाचं भरभरून कौतुक केलं होतं. तेव्हा तिने रणवीरचा अभिमान असल्याचं सांगत फॅन्सना हा सिनेमा पाहण्याचं आवाहनही केलं होतं. यावेळी मात्र तिनं सोशल मीडियापासून लांब राहून वैयक्तिक पातळीवर आनंद साजरा करण्याला प्राधान्य दिलं आहे.

दीपिकाच्या या शांततेवर चाहत्यांनी राग व्यक्त केला होता. मात्र, आता दीपिकानं याबाबत तिला ट्रोल करणाऱ्यांना अगदी मजेशीर पद्धतीनं यावर उत्तर दिलं आहे.

Comments
Add Comment

Eijaz Khan on Govinda controversy : गोविंदा-सुनीता वादात एजाज खानची एण्ट्री; म्हणाला, “मुलांना भविष्यात काम मिळणं कठीण होऊ शकतं”

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा (Govinda - Sunita Ahuja) यांच्या वैवाहिक नात्यातील मतभेद पुन्हा

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच