ST Buses Tickets Rate : उन्हाळ्यात प्रवाशांना झटका; ST तिकिट दरात वाढ जाहीर

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. आता तिथे जाण्यासाठी सरकारी सुविधांचा वापर म्हणजे ST, रेल्वे यांचा वापर केला जाणारच. पण ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीवेळीच राज्य परिवहन मंडळाने ST भाडे वाढवले आहे.



भाडेवाढीमागील कारणे


उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ग्रामीण भागात जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने ST सेवेला मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार ST महामंडळाला असून, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.



किती टक्के वाढ?


राज्य परिवहन प्राधिकरणाने ST महामंडळाला सणासुदीच्या आणि गर्दीच्या काळात ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. ही वाढ १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होणार आहे.



स्वच्छता अधिभाराची अंमलबजावणी


ST स्थानके, बसगाड्या आणि आगार स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे.


सवलतधारक आणि पासधारकांसाठीही अधिभार लागू
महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारक प्रवाशांनाही हा स्वच्छता अधिभार लागू असेल. त्यामुळे सर्व प्रवाशांवर या वाढीचा परिणाम होणार आहे. ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत चार आणि सात दिवसांच्या पासवर ५ रुपये अधिभार आकारला जाणार आहे. मात्र आगाऊ आरक्षणातून घेतलेल्या पासवर हा अधिभार लागू नसेल. तसेच बस भाड्याने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये अधिभार द्यावा लागणार आहे.



प्रमुख मार्गांवरील नवे दर


भाडेवाढीनंतर काही महत्त्वाच्या मार्गांवरील तिकिट दर पुढीलप्रमाणे असतील:


परळ ते कोल्हापूर - ६४० ऐवजी आता ७०४ रुपये
मुंबई ते कोल्हापूर - ७५० ऐवजी आता ८२५ रुपये
मुंबई ते लातूर - ९०० ऐवजी १००० रुपये
मुंबई ते रत्नागिरी - ६०० ऐवजी ७०० रुपये तिकीट दर असणार आहे.
मुंबई ते पुणे - २८२ ऐवजी ३१४ तिकीट दर
मुंबई ते नाशिक - ३२३ ते ३५९ रुपये
मुंबई ते अलिबाग - १८२ ऐवजी २०४ रुपये
मुंबई ते चिपळूण - ४५३ ऐवजी ५०२ रुपये


ही भाडेवाढ साधी बस, मिडी बस, जलद सेवा आणि रात्रसेवा देणाऱ्या गाड्यांसाठी लागू असेल. मात्र शिवनेरी, शिवशाही, जनशिवनेरी, हिरकणी, शयनयान आणि ई-बस सेवांना या वाढीतून वगळण्यात आले आहे.


एकूणच, उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता ST ने हा निर्णय घेतला असला, तरी या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

Comments
Add Comment

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :

Mankhurd : मानखुर्द येथील सरकारी जमिनीवरील बाराशे अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, तब्बल अकरा एकर जमीन अतिक्रमणमुक्त उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क' मुंबई

BMC News : पाणी साचणाऱ्या ठिकाणांपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले निर्देश मुंबईतील मिठी नदीसह नाल्यांची भिडे यांनी

Png And Lpg Gas Cylinder : PNG असेल तर LPG होणार बंद? 1 जुलैपासून या नव्या नियमांची होणार अंमलबजावणी

मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनावर 'या' प्रसिद्ध युट्युबरने केले असे काही की थेट झाली जेल वारी

मुंबई : २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामतीमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि संपूर्ण