Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार


मुंबई : आगामी राजकीय आव्हाने आणि पक्षांतर्गत मरगळ झटकण्यासाठी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जे काम करतील तेच पदावर राहतील," असा इशारा देत त्यांनी शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अकार्यक्षम नेत्यांना घरचा रस्ता दाखवून नव्या दमाच्या शिलेदारांना संधी देण्याची तयारी त्यांनी यानिमित्ताने सुरू केली आहे


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या दोन मंत्र्यांच्या कामगिरीवर शिंदे प्रचंड नाराज आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदेंनी स्वतः झंझावाती प्रचार करूनही, काही मंत्री स्वतःच्या बालेकिल्ल्यात पक्षाला अपेक्षित यश मिळवून देऊ शकले नाहीत. नागपूर अधिवेशनावेळीच या मंत्र्यांची गच्छंती होणार होती, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. आता मात्र या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


पक्षात केवळ सत्तेचा लाभ घेण्यासाठी किंवा निधी मिळवण्यासाठी येणाऱ्यांना जागा नाही, असे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. "आता आपल्याला क्वांटिटी (संख्या) नको, तर क्वालिटी (दर्जा) हवी आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका नेत्यांकडे स्पष्ट केली आहे. यापुढे मंत्र्यांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंत प्रत्येकाच्या कामाचा अहवाल तयार होईल. जे प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी काम करतील, त्यांनाच भविष्यात मोठी पदे दिली जातील, तर कामचुकारांना पदावरून पायउतार व्हावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मागील आठवड्यात पुण्याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून शिंदेंनी आधीच आपला इरादा स्पष्ट केला आहे.



भाजपच्या धर्तीवर संघटनात्मक बांधणी


शिवसेना आता भारतीय जनता पक्षाच्या धर्तीवर आपली संघटनात्मक रचना अधिक शिस्तबद्ध करत आहे. राज्यातील सर्व ४३ हजार गावांपर्यंत शिवसेना पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक मतदार यादीवर (बूथ लेव्हल) ‘बीएलए’ नेमून कामाचा जोर वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी काळात होणाऱ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी पक्ष आतापासूनच सज्ज व्हावा, यासाठी मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.



आमदार-खासदारांवर दुहेरी जबाबदारी


नव्याने जाहीर करण्यात आलेल्या संपर्क प्रमुखांच्या यादीत अनेक आमदार आणि खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना केवळ स्वतःचा मतदारसंघ सांभाळून चालणार नाही, तर सोपवण्यात आलेल्या जिल्ह्याचा आणि लोकसभा क्षेत्राचा प्रगती अहवाल वरिष्ठ नेत्यांना सादर करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

Pune News : थेट जमिनीवर आपटल्या अन्...; वॉटरपार्कमधील कमी पाणी महिलेच्या जीवावर बेतले, आयुष्यभराचे अपंगत्व

पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटरपार्ककडे वळत असतानाच, शिरूर

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य