मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाला न बोलवल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं आहे. महेश उद्धव भणगे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून, त्याने राहत्या घरी विष प्राशन करुन हे टोकाचं पाऊल उचललं.


आपल्या जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता. त्यातूनच, त्यानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती असून याप्रकरणी, पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.


नेमकं काय घडलं ?


या तरुणानं आपल्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर झोपायला गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्यानं रात्री ८ वाजताच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी घराच्या छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीनं अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. पण, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


आत्महत्येपूर्वी महेशनं आपल्या मोबाईलवर "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो" असं हृदयद्रावक स्टेटस ठेवलं होतं. गेल्या सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्यावेळी महेशला मित्रांनी बोलावलं नाही आणि त्याला सोडूनच इतरांनी सेलिब्रेशन केलं.


या घटनेमुळे तो नैराश्येत गेला आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या घटनेचा अधिकच तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार मुंबई :

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :