महाराष्ट्रात आता 'एआय'साठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग


मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महावितरणची आर्थिक पुनर्रचना करणार


मुंबई : राज्याच्या प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी अनेक क्रांतिकारी निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार, आता 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (एआय) आणि माहिती तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग स्थापन करण्यात येणार असून, महावितरणची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी तिची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्यातील डिजिटल गव्हर्नन्सला गती देण्यासाठी सध्याच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर आता 'इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयात' केले जाणार आहे. विशेष म्हणजे, मंत्रालयीन विभाग, आयुक्तालय आणि सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरूपी पदांचा समावेश असलेला स्वतंत्र 'आयटी संवर्ग' (आयटी केडर) निर्माण केला जाईल. यामुळे सरकारी कामकाजात एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य होणार आहे.



महावितरण शेअर बाजारात उतरणार


राज्यातील वीज वितरण व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी महावितरणच्या आर्थिक पुनर्रचनेचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, महावितरण कंपनी आता शेअर बाजारात (लिस्टिंग) नोंदणीकृत होणार आहे. शासन हमी असलेल्या ३२ हजार ६७९ कोटी रुपयांच्या कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे आणले जातील. कृषी वीज वितरण व्यवसायाचे स्वतंत्र विभाजन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला, ज्यामुळे कृषी पंपांच्या वीज पुरवठ्याचे व्यवस्थापन अधिक सुलभ होईल.

'महाजिओटेक' कंपनीची स्थापना


नियोजन विभागांतर्गत कार्यरत असलेले 'महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर' (एमआरसॅक) आता सोसायटीऐवजी कंपनी (कलम ८ अंतर्गत) म्हणून काम करणार आहे. या बदलामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार, आणि खाणकामाच्या अभ्यासाला व्यावसायिक गती मिळेल. तसेच, भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 'महाजिओटेक' ही नवीन कंपनी स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. याद्वारे विद्यार्थी आणि संशोधकांसाठी नवीन शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातील.

आपत्ती व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेचे सहाय्य


'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (एमआरडीपी) अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनासाठी खासगी भांडवल आणि जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा निधी उभारला जाणार आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना गृहकर्जात आणि लघु उद्योजकांना व्यवसायासाठी विशेष सवलती व विमा सुरक्षा दिली जाईल. कृष्णा खोऱ्यातील सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी या शहरांमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यात येणार आहेत.



Comments
Add Comment

Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे.

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग

Pune News : नराधम माता! स्वार्थासाठी आईनेच संपवला ११ महिन्यांचा पोटचा गोळा; कारण ऐकून बसेल धक्का...

शिरूर : आईच्या प्रेमाला कलंक लावणारी एक अतिशय संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे उघडकीस आली आहे. एका

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी