Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेळता खेळता चेंडू घराच्या छतावर गेला, जो आणण्यासाठी हा मुलगा उत्साहाने वर चढला. मात्र, तिथे असलेल्या विजेच्या उच्च दाबाच्या तारेचा त्याला भीषण स्पर्श झाला. विजेचा धक्का इतका जोरदार होता की, क्षणात मुलाच्या अंगातील कपड्यांनी पेट घेतला आणि तो छतावरून खाली कोसळला. भररस्त्यात मुलाच्या शरीरातून धूर निघत असताना आणि तो वेदनेने धडपडत असताना पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. विजेचा प्रवाह शरीरात असण्याच्या भीतीने सुरुवातीला कोणाचेही पुढे जाण्याचे धाडस झाले नाही. काही क्षणांपूर्वी मैदानावर उमटणारे हास्य एका भीषण किंकाळीत बदलले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे सावट पसरले आहे. चिमुकल्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



छतावर चेंडू आणायला गेला आणि...


मित्रांसोबत खेळात दंग असलेला अरमान खान हा मुलगा एका भीषण अपघाताचा बळी ठरला. उत्साहाने चौकार-षटकार मारणाऱ्या या मुलांचा खेळ सुरू असताना अचानक चेंडू जवळच असलेल्या एका दुकानाच्या लोखंडी पत्र्यावर गेला आणि सर्वच चित्र बदलले. चेंडू आणण्यासाठी अरमान उत्साहाने पत्र्याच्या छतावर चढला, मात्र तिथेच मृत्यू दबा धरून बसला होता. छताच्या अगदी जवळून विजेच्या हायव्होल्टेज तारा गेल्या होत्या. चेंडू उचलण्याच्या प्रयत्नात असताना अरमानचा हात उघड्या तारेला लागला. लोखंडी पत्रा आणि उच्च दाबाचा वीजप्रवाह यामुळे प्रचंड मोठा स्फोट झाला. हा झटका इतका भीषण होता की, अरमानचा जागीच कोळसा झाला. क्षणात हसतं-खेळतं वातावरण आक्रोशात बदलले असून या घटनेने संपूर्ण कुंडलवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.



नांदेडमधील घटनेने पालकांमध्ये भीतीचं वातावरण


बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे घडलेल्या त्या भीषण वीज अपघातानंतर परिसरात अद्यापही दहशतीचे वातावरण आहे. डोळ्यादेखत मित्राला आगीच्या विळख्यात पाहिल्यानंतर सोबत खेळणाऱ्या इतर लहान मुलांची अक्षरशः बोबडी वळाली. हायव्होल्टेज तारेच्या धक्क्याने अरमान गंभीररीत्या भाजला असून, त्याला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अरमानवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. हसत-खेळत घराबाहेर पडलेला मुलगा थेट मृत्यूच्या दारात पोहोचल्याने खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला असून, उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळणाऱ्या मुलांवर पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अरमानच्या जिवासाठी सध्या संपूर्ण जिल्हा प्रार्थना करत असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

Alandi Flood : पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

- विविध विकास कामांसाठी एकूण १० कोटींचा विशेष निधी मंजूर! मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात ; लालपरी, कारच्या अपघातात तीनजण गंभीर

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad highway) कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण

Ahilyanagar : धुवाधार पावसाचा कहर ! घाटघर येथे ३२१ मिमी पावसाची नोंद, अनेक धबधबे, किल्ले आणि ट्रेकिंग मार्गांवर प्रवेशबंदी

Ahilyanagar : अकोले तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हरिश्चंद्रगड-भंडारदरा (Harishchandragad and Bhandardara) परिसरात

Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026 : तुकोबाराय व माऊलींच्या पालखी स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी

Satara : महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 513 मिमिची नोंद, 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

Satara : मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई (Mumbai), पुणे , नाशिक याठिकाणी पावसाने मोठ्या

Chandrashekhar Bawankule : गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी कोकणासह प्रमुख शहरांमध्ये 'ड्रोन' सर्वेक्षण

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; गौण खनिजांच्या देखरेखीसाठी कोकणात हायटेक