Nagpur News : नागपूरमध्ये २८ वर्षीय एअर होस्टेसची गळफास घेऊन आत्महत्या; मध्यरात्री प्रियकराशी फोनवर बोलली अन्...

नागपूर : नागपूरमधील लकडगंज (Nagrpur News) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. नुकतीच करिअरची नवी उड्डाणे घेण्यास सज्ज झालेल्या २८ वर्षीय एअर होस्टेसने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्री उर्फ गौरी बनसोड असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.



नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, गायत्रीने नुकतेच एअर होस्टेसचे प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि एका नामांकित खासगी विमान कंपनीत तिने नोकरीला सुरुवात केली होती. गायत्रीचे एका तरुण डॉक्टरासोबत प्रेमसंबंध होते आणि विशेष म्हणजे या दोघांचे लग्नही ठरले होते. मात्र, रविवारी मध्यरात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास गायत्री आणि तिच्या प्रियकरामधून फोनवर जोरदार वाद झाला. या वादानंतर गायत्री मानसिकदृष्ट्या प्रचंड अस्वस्थ झाली होती. याच नैराश्यातून तिने रात्रीच्या सुमारास राहत्या घरातील फ्लॅटमध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले. घटनेच्या वेळी गायत्रीचे कुटुंबीय काही कामानिमित्त भंडारा येथे गेले होते. घरी कुणीही नसल्याची संधी साधून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबीय जेव्हा भंडाऱ्याहून परतले, तेव्हा गायत्रीने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा धक्कादायक प्रकार पाहताच त्यांनी एकच टाहो फोडला.



पोलिसांकडून तपास सुरू


घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपासात प्रियकरासोबत झालेला वादच आत्महत्येस कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी गायत्रीच्या प्रियकराची आणि कुटुंबीयांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा

Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात आता 'एआय'साठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महावितरणची आर्थिक पुनर्रचना करणार मुंबई : राज्याच्या प्रशास

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग

Pune News : नराधम माता! स्वार्थासाठी आईनेच संपवला ११ महिन्यांचा पोटचा गोळा; कारण ऐकून बसेल धक्का...

शिरूर : आईच्या प्रेमाला कलंक लावणारी एक अतिशय संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे उघडकीस आली आहे. एका

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक