BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे?


मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून रस्त्यांवरील सार्वजनिक कचरा कुंडयांचे संख्या कमी केली जात असतानाच आता महापालिका प्रशासन तब्बल १३ हजार ५०० कचरा कुंड्यांची खरेदी करणार आहे. त्यामुळे या मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्यांचा वापर नक्की कुठे होणार आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या २४० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्यांची खरेदी करण्यात येत असून या कचरा पेट्यांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पात्र ठरलेल्या प्रायमा प्लास्टिक्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल २०३९ दराने २४० लिटर क्षमतेच्या या १३,५०० कचरा पेट्यांची खरेदी केली जाणार आहे. यासाठी तब्बल पावणे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. स्थायी समितीची मान्यता मिळण्यास अजुन काही कालावधी लागेल यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीची बाब म्हणून २४५२ कचरा पेट्यांच्या खरेदीचे आदेशही बजावले आहेत.


घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या शाळा,रुग्णालये आणि विभाग कार्यालये आदींकडून कचरा पेट्यांची मागणी झाल्यामुळे याची खरेदी करण्यात येत आहे. तसेच महापालिकेने खरेदी केलेल्या कॉम्पॅक्टर्समध्ये या बंदिस्त कचरा पेट्या उचलण्याची व्यवस्था आहे. या कचरापेट्या या कॉम्पॅक्टर्सद्वारे सहजपणे उचलता येतात व रिकाम्याही करता येतात, त्यामुळे आता २४० लिटर्स क्षमतेच्या कचरा पेट्यांची खरेदी केली जात आहे,असे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची