Pratap Sarnaik : रिक्षा परवान्यांसाठी आता 'मराठी' सक्तीची

मागील १० वर्षांतील परवान्यांची होणार सखोल फेरतपासणी; १ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश


मुंबई : रिक्षांच्या परवानेवितरण प्रक्रियेत होणारी अनियमितता आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने लाटणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने आता कठोर पाऊले उचलली आहेत. रिक्षा परवाना हवा असेल, तर मराठी भाषा येणे अनिवार्य आहे, असे निर्देश देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागील १० वर्षांत दिलेल्या सर्व रिक्षा परवान्यांची सखोल पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः मीरा-भाईंदर क्षेत्रातील कथित घोटाळ्याची गंभीर दखल घेत, या मोहिमेची सुरुवात याच भागातून होणार आहे.


वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राज्यातील परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला खडे बोल सुनावत १ मे पर्यंत संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे कठोर निर्देश दिले. मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात पुराव्यांसह तक्रार केली होती. काही परदेशी नागरिकांनी (बांगलादेशी) स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने बनावट रहिवासी दाखले मिळवून रिक्षा आणि टॅक्सी परवाने हस्तगत केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.


तक्रारीनुसार, डाचकुलपाडा आणि मांडवीपाडा येथील रहिवासी असल्याचे भासवण्यासाठी 'अदानी पॉवर'ची वीज बिले सादर करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात या भागात 'टाटा पॉवर'तर्फे वीज पुरवठा केला जातो, हे मेहता यांना पुराव्यासह समोर आणले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, मीरा-भाईंदर परिसरात एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. महिनाभराचा विशेष कॅम्प आयोजित करून प्रत्येक कागदपत्राची बारकाईने छाननी केली जाईल, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.



...तर परवाना रद्द करणार


मोटार परिवहन नियमांनुसार परवानाधारकाला मराठी येणे बंधनकारक आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांचे परवाने रद्द होऊ शकतात. फेरतपासणीत रहिवासी दाखले आणि वीज बिलांची सत्यता पडताळली जाईल. चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांचीही गय केली जाणार नाही, असे संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. या मोहिमेसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मीरा-भाईंदरनंतर ही तपासणी मोहीम राज्यभर राबविली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे