KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित लिपिक निलंबित करण्यात आले असून महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.



धमकी देत शरीर सुखाची मागणी


मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एका कामावरून भूषण पाटील आणि पीडित महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. यावेळी पाटील याने सर्वासमक्ष तिला शिवीगाळ केली होती. या वादानंतर परिस्थिती शांत झाली असे वाटत असतानाच २० फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीने पीडितेला फोन केला. त्यावेळी “तुला कामावरून काढण्याचे आदेश आले आहेत” असे सांगत, ही कारवाई थांबवायची असेल तर तर तुला मला जे हवं ते द्यावं लागेल... " असे म्हणत आरोपीने शरीर सुखाची मागणी केली आणि याचा दबाव टाकल्याचा आरोप महिलेने केला आहे.



मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल


या घटनेनंतर पीडितेने मानपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



पालिकेकडून तात्काळ कारवाई


घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी तातडीने कारवाई करत संबंधित लिपिकाला निलंबित करण्याचे आदेश दिले. तपासात कोणताही अडथळा येऊ नये, तसेच पुरावे आणि साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.



महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


या घटनेमुळे सरकारी कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कार्यस्थळी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी