West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते मोफक्करुल इस्लाम याला आज, शुक्रवारी बागडोगरा विमानतळाहून अटक करण्यात आली. मोफक्करूल पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.


देशाच्या इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये देखील मतदारयादी पुनर्निरीक्षणाचे (एसआयआर) सुरू आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध मतदार आणि बांगलादेशी घुसखोरांची नोंद मतदार यादीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरळीतपणे होऊ दिली जात नसल्याचा आरोप केला जातो. अशातच राज्याच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे सुनियोजित पद्धतीने हिंसाचार घडवून एसआयआर करणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांना 9 तास ओलिस ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम बंगालच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.


सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. हिंसाचाराच्या प्रारंभिक चौकशीत असे आढळून आले की, पेशाने वकील असलेला एआयएमआयएमचा नेता मोफक्करुल इस्लाम हा या हिंसाचाराचा मुख्य सुत्रधार आहे. हिंसाचाराच्या व्हायरल व्हिडिओमध्ये इस्लाम अतिशय आक्रमक भूमिकेत दिसून येतो, जिथे तो जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघडपणे आव्हान देताना दिसतो. व्हिडिओमध्ये तो कॅमेऱ्यासमोर ओरडताना ऐकू येतो: “ओए डीएम, एसपी… सीआयडी कुठे आहे ? आयबी कुठे आहे ? तुम्ही सगळे कुठे आहात? इथे या…” प्रशासनाविरोधातील अशा वक्तव्यांमुळे आणि लोकांना भडकावल्याच्या आरोपांमुळे तो पोलिसांच्या रडारवर आला होता. तपासात असेही समोर आले आहे की सुजापूर आणि कालियाचक परिसरातील अलीकडील हिंसक आंदोलनांचे नेतृत्वही त्याच्याकडे होते.


यापूर्वी 2021 साली झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोफक्करूल इस्लामने उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इताहर मतदारसंघातून एआयएमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. इस्लामच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तर अटक टाळण्यासाठी मोफक्करूल भूमीगत झाला होता. अशातच पोलिसांना माहिती मिळाली की, सिलीगुडीच्या बागडोगरा विमानतळाहून इस्लाम कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून विमानतळ्याचा टर्मिनल जवळ त्याला अटक केली.


पोलिसांच्या माहितीनुसार, इस्लामच्या हिंसाचारातील भूमिकेची सखोल चौकशी सुरू आहे. सुजापूरमधील आंदोलनाचे नियोजनबद्ध नेतृत्व त्यानेच केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या हिंसाचारामागे कोणती मोठी साखळी किंवा कट होता का, याचा पोलीस घेत शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून