जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की अधिसूचना काढली जाईल आणि विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. हे झाले की वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणे, जन्म आणि मृत्यूची नोंद करण्यात चुका करणे हे गुन्हे ठरणार नाही.


देशात जन विश्वास हा कायदा लागू झाला की होणाऱ्या बदलाचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होईल. आता, वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मुदत संपल्यानंतर ३० दिवसांपर्यंत वैध राहील, म्हणजेच किरकोळ विलंबामुळे तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही. राष्ट्रीय महामार्ग अडवण्यासारख्या प्रकरणांमधील तुरुंगवासाची शिक्षा रद्द करण्यात आली असून, आता केवळ दंडाची तरतूद आहे. त्याचप्रमाणे, आगीच्या धोक्याची खोटी सूचना देणे, जन्म आणि मृत्यूची नोंद करण्यास विलंब करणे किंवा विद्युत नियमांचे उल्लंघन करणे यांसारख्या प्रकरणांमधील तुरुंगवासाची शिक्षा देखील काढून टाकण्यात आली आहे. पूर्वी सौंदर्यप्रसाधनांच्या नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकत होती, पण आता केवळ दंड आकारला जाईल. याचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राला फायदा होईल.


विश्वासावर आधारीत प्रशासकीय आराखड्याला चालना देणे आणि नियमनांमध्ये प्रमाणबद्धता असेल याची सुनिश्चिती करण्याबद्दलची केंद्र सरकारची वचनबद्धता यातून दिसून येते. किरकोळ गुन्ह्यांना गुन्हे सूचीतून वगळून तसेच विद्यमान कायदेशीर तरतुदीमध्ये तर्कसंगतता साधत, व्यक्ती तसेच उद्योग व्यवसायांवरील अनुपालनाचा ताण कमी करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. या ​विधेयकातील तरतुदींअंतर्गत ७९ केंद्रीय कायद्यांमधील ७८४ तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी यांपैकी ७१७ तरतुदींना गुन्हे या वर्गातून वगळण्यात आले आहे. जीवन सुलभतेसाठी ६७ तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या निमित्ताने केंद्र सरकारचा भर शिक्षेऐवजी सुधारणेकडे असल्याचे दिसून येत आहे. जन विश्वास विधेयकाचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायद्यात रुपांतर झाल्यानंतर सामान्य माणसाला दिलासा मिळेल आणि न्यायव्यवस्थेवरील अनावश्यक ताण कमी होईल.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत