छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ ट्रस्ट, सोलापूर यांच्या वतीने तसेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी, सोलापूर यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी महापौरांच्या हस्ते रक्तदान केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, उन्हाळा सुरू झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, अशा परिस्थितीत श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ ट्रस्ट यांनी आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून समाजासाठी उपयुक्त आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे अनेकांना जीवनदान मिळते, असेही त्यांनी नमूद करत आयोजकांचे आभार मानले.या प्रसंगी सभागृह नेते नरेंद्र काळे,ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, राजन जाधव ,माजी आमदार रविकांत पाटील मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर , नगरसेवक मनीष केत,बजरंग जाधव , गणेश शेळके, नामदेव पवार, विजय पुकाळे, नाना भोईटे, उत्तरा बरडे, उज्वला साळुंखे , विजय चव्हाण , लता ढेरे , अंबादास शेळके ,शिवाजी वाघमोडे, श्रीकांत डांगे हरीभाऊ सुरवसे, नागेश वडणे , प्रकाश ननवरे ,वैभव गंगणे,महेश हनमे, भैय्या ताकभाते, सचिन स्वामी, देविदास घुले, शंतनू साळुंखे ,पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू

पुणे : इराण आणि इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात तेलाच्या गॅसच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०