संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ कारणावरून दगडफेक झाली आणि तोडफोड करण्यात आली. हनुमान जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक संपल्यानंतर ही घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या किरकोळ वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने आपल्या १५ ते २० साथीदारांसह दुकानावर हल्ला चढवला. यावेळी दुकानासमोरील काऊंटरची काच फोडण्यात आली तसेच खुर्च्या, प्लेट्स यांची तोडफोड करण्यात आली. दुकानातील मालाची नासधूस करून नुकसान करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले की, ही घटना पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून झालेल्या वादातून घडली असून यामागे कोणताही पूर्वीचा वाद नाही. तसेच या घटनेला जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतले संतांच्या पादुकांचे दर्शन

पंढरपूर : “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

Ashadhi Ekadashi 2026 : पांडुरंगाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले का असतात ? जाणून घ्या 'हे' गुपित अन् पौराणिक कथा!

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, वारकरी संप्रदायाचे प्राण आणि भक्तांचे पाठीराखे असलेल्या भगवान

Shivshahi Bus Fire : धावत्या शिवशाही बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५० हून अधिक प्रवाशांचे प्राण

धुळे : धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला बुधवारी अचानक भीषण आग

Pune Crime : मित्रांशी गप्पा मारत उभा होता... तितक्यात मागून 7 जण आले अन् अवघ्या 30 सेकंदांत 30 वार; पुण्यातील कात्रज हादरले!

पुणे: पुण्यातील कात्रज तलाव परिसरात सोमवारी रात्री एका 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक

Ajit Pawar Birthday : अजितदादांच्या आठवणींनी भावुक झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू..."; अजितदादांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भावनिक

Devendra Fadnavis : 'देवेंद्र! बस नाम ही काफी है'; मुख्यमंत्री फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनोख्या शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास शब्दांत