Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि मालेगाव सेक्युलर फ्रंटचे नगरसेवक एकमेकात भिडले आणि मोठा गदारोळ झाला. मालेगाव मध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच मतभेद चव्हाट्यांवर आले आहेत.


निवडणूक आयोगातर्फे सध्या मतदार यादी पडताळणी व पुनरीक्षणाचे (एसआयआर) काम सुरू आहे. त्यासाठी मालेगावात नियुक्त करण्यात आलेल्या काही केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) हे काम स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी पडताळणी व पुनरीक्षणाच्या कामात मतदारांना महापालिकेतर्फे मार्गदर्शन व सहाय्य सहाय्य करावे, या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी महापौर नसरीन बानो शेख यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते.


महापालिकेतर्फे 'एसआयआर' कामासाठी 'बीएलओ' यांना मदतीसाठी मानधन तत्वावर काही तरुणांची मानधन तत्वावर नियुक्ती करावी, अशी सूचना समाजवादी पार्टीचे गटनेते मुस्तकीम डिग्निटी यांनी मांडली. त्यानंतर मतदार यादीच्या कामासाठी खाजगी व्यक्तींना नियुक्त करता येते का, असा प्रश्न शिवसेनेचे नरेंद्र सोनवणे यांनी उपस्थित केला. असे तरुण नियुक्त केले गेले तर त्यांना मानधन देण्यासाठी आर्थिक तरतूद कशी करणार, अशी विचारणा 'एमआयएम'चे खालीद परवेज यांनी उपस्थित केला. ही चर्चा सुरू असतानाच खालिद परवेज व अन्य नगरसेवक महापौरांच्या हौदासमोर आले.


त्यावरून 'एमआयएम' व 'इस्लाम' पक्षाच्या सदस्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर या दोन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला. सभागृहातील विविध पक्षीय सदस्यांनी आक्रमक झालेल्या 'एमआयएम' व 'इस्लाम' पक्षाच्या सदस्यांना आवर घालत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळानंतर 'एमआयएम'चे सदस्य महासभेवर बहिष्कार घालत सभागृहाबाहेर पडले. या गोंधळानंतर 'एसआयआर' च्या कामात मतदारांना सहाय्य करण्यासाठी मानधन तत्वावर तरुणांची नियुक्ती करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. महासभेला उपमहापौर शान-ए-हिंद, आयुक्त रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त हेमलता डगळे, नगरसचिव साजिद अहमद आदी उपस्थित होते

Comments
Add Comment

संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू

पुणे : इराण आणि इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात तेलाच्या गॅसच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या