अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा झालेले फोन कॉल ?

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा फोन कॉल झाल्याचा आरोप उबाठाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.


फसवणूक करून महिलांवर अत्याचार करणे, समोरच्या व्यक्तीच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणे, राजकीय लागेबांधे यांचा वापर करून कायदे धाब्यावर बसवणे, गरज पडल्यास दहशत बसवून पैसे उकळणे हे प्रकार अशोक खरात करत होता का ? करत असल्यास कसे आणि कोणकोणत्या प्रकरणात हे घडले आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. अशोक खरात आणि चाकणकर भगिनी यांच्यातील लागेबांधे याचाही तपास सुरू आहे. पोलिसांचे विशेष तपास पथक अर्थात एसआयटी चौकशी करत आहे.


महिलांचे लैंगिक शोषण, जादूटोणा, आर्थिक फसवणूक, दमदाटी आणि धमकी आदी प्रकरणांमध्ये अशोक खरात विरोधात नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये पोलिसांत अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सध्या अशोक खरातला एका प्रकरणात न्यायालयीन आणि दुसऱ्या प्रकरणात पोलीस कोठडी झाली आहे. एसआयटीचे अधिकारी खरातची चौकशी करत आहेत. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात १७७ फोन कॉल झाले. दोघांमध्ये ३३ हजारांपेक्षा जास्त सेकंदांसाठी बोलणे झाले आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा यांच्याशीही अशोक खरातचे २३६ फोन कॉल झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणातही तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवर आज वांद्रे येथे 'मेजर ब्लॉक'

मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान 'जम्बो ब्लॉक मुंबई : वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान असलेल्या मोऱ्या

‘एमआयडीसी’च्या बनावट पत्राद्वारे अधिवेशनाच्या पासची विक्री

६ जणांना अटक; मंत्रालय आणि विधिमंडळ सचिवालयातील कर्मचाऱ्यांचा कारनामा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय

पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला, ६५ जण जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.

अमित ठाकरेंकडे पुणे, यशवंत किल्लेदारांकडे कोल्हापूर

मनसेकडूनही जिल्हा संपर्क अध्यक्षांची घोषणा मुंबई : शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्हावार

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ‘त्या' पत्रावरून राष्ट्रवादीत ठिणगी?

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाचे वारे वाहू लागले असून,

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर