मार्चमध्ये युपीआयमधून नागरिकांनी केले कोटींचे व्यवहार; युपीआय ठरतोय वरदान

मुंबई : भारताने सुरु केलेली यूपीआय ही डिजिटल प्रणाली आज जगभर पोहोचली आहे. हातात कॅश नसेल तर आता घाबरून न जात आपण बिनधास्तपणे डिजिटल प्रणाली वापरत आहोत. अगदी किराणा मालापासून ते लाखोंचे व्यवहार करण्यापर्यंत युपीआय वापरले जाते आहे. सणासुदीच्या काळात तर या व्यवहारांत अधिक भर पडते.


प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मागच्या मार्च महिन्यात युपीआयने पेमेंट करणाऱ्यांची संख्या ही कोटींपर्यंत पोहोचली आहे. आणि एकट्या मार्च महिन्यात २२.६४ अब्ज असे विक्रमी संख्येने व्यवहार पार पडले आहेत. मार्च २०२५ महिन्याची तुलना करता, मार्च २०२६ मध्ये या व्यवहारांमध्ये १९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच फेब्रुवारीत एकूण २६.८४ लाख रुपये इतके व्यवहार झाले असून मार्च महिन्यात त्यात १० टक्क्यांनी वाढले आहेत.



मार्च महिन्यातील सण


मार्च महिन्यात होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, ईद असे अनेक सण तसेच देवतांच्या यात्रा - जत्रा, उत्सव असतात. या निमित्ताने देशात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या खरेदीसाठी यूपीआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. दररोज सरासरी ७३ कोटी व्यवहार झाले आहेत असे निदर्शनास आले. ज्यांचे दैनिक मूल्य हे ९५,२४३ कोटी रुपये इतके आहे.


आजच्या काळात भारतात डिजिटल पेमेंट्सवर जास्त भर दिला जात आहे. एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास ८५ टक्के व्यवहार हे पूर्णपणे युपीआयच्या आधाराने केले जातात.

Comments
Add Comment

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

TMC MPs notice : टीएमसीच्या २० बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची नोटीस

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया