Amazon Flipkart Sale Discount Reality : Amazon-Flipkart च्या सेलमध्ये ७०% डिस्काउंटचा झगमगाट! पण ऑर्डर करण्यापूर्वी 'हा' फंडा समजून घ्या, अन्यथा खिसा होईल खाली!

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाचे (Independence Day) औचित्य साधून Amazon, Flipkart आणि Myntra यांसारख्या नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर भव्य 'फ्रीडम डे सेल' (Freedom Day Sale) सुरू होत आहे. ऑनलाइन सेलचे बॅनर्स दिसताच बहुतांश ग्राहकांचे डोळे ५०%, ७०% डिस्काउंट किंवा 'सर्वात कमी किंमत' (Lowest Price Ever) अशा जाहिरातींवर स्थिरावतात. मात्र, स्क्रीनवर दिसणारा डिस्काउंटचा मोठा आकडा खरोखरच तुमचा मोठा फायदा करून देणारा असतो का? याचे उत्तर बऱ्याचदा 'नाही' असे असू शकते. मोठ्या सवलतींच्या या झगमगाटामागे ई-कॉमर्स कंपन्यांच्या मार्केटिंगच्या काही खास युक्त्या दडलेल्या असतात.



७०% ऑफचा बनाव : आधी दर वाढवायचे अन् मग डिस्काउंट दाखवायचा!


ऑनलाइन खरेदीच्या दुनियेत एक खास प्रकार वारंवार पाहायला मिळतो. मोठा सेल सुरू होण्याच्या अवघ्या २ ते ३ दिवस आधी एखाद्या वस्तूची मूळ विक्री किंमत अचानक वाढवून दिली जाते. त्यानंतर सेल सुरू होताच, त्याच फुगवलेल्या किंमतीवर ७०% डिस्काउंटची पाटी लावली जाते. यामुळे ग्राहकाला आपल्याला मोठी ऑफर मिळाल्याचा आभास होतो, परंतु प्रत्यक्षात ती वस्तू सेल सुरू होण्यापूर्वीही त्याच दरात किंवा त्याहून स्वस्त मिळत असते. म्हणूनच, केवळ ६०% किंवा ७०% डिस्काउंटची जाहिरात पाहून थेट 'Buy Now' वर क्लिक करणे चुकीचे ठरू शकते. वस्तूची गेल्या १ ते २ महिन्यांतील सरासरी किंमत काय होती, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.



एमआरपी (MRP) वर मिळणाऱ्या सवलतीचे खरे वास्तव


अनेक ई-कॉमर्स कंपन्या एखाद्या प्रॉडक्टच्या एमआरपीवर (Maximum Retail Price) भरघोस सूट दाखवून ग्राहकांना आकर्षित करतात. परंतु वास्तव हे आहे की, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्ही वर्षभर कधीच एमआरपीवर विकले जात नाहीत; ते नेहमीच कमी दरात उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, ५०,००० रुपये एमआरपी असलेला फोन जर सेलमध्ये ३९,९९णी रुपयांना मिळत असेल, तर तुमचा १०,००० रुपयांचा निवळ फायदा झाला असे मानणे चुकीचे आहे. कारण तोच फोन नेहमीच्या दिवसांतही ३९,९९९ किंवा अगदी ३८,९९९ रुपयांना विकला गेलेला असू शकतो. त्यामुळे एमआरपीची आकडेवारी पाहून निर्णय घेऊ नका.



सोशल मीडियावरील 'स्क्रीनशॉट्स' अन् 'डायनॅमिक प्रायसिंग'ची संकल्पना


दरवर्षी मोठ्या फेस्टिव्हल सेलदरम्यान सोशल मीडियावर अनेक ग्राहक संतप्त होऊन सेलआधीच्या आणि सेलनंतरच्या दरांचे स्क्रीनशॉट्स शेअर करताना दिसतात. नक्कीच, सर्वच प्रकरणांमध्ये विक्रेते मुद्दाम फसवणूक करतात असे नाही. ऑनलाइन शॉपिंगमध्ये 'डायनॅमिक प्रायसिंग' (Dynamic Pricing) ही प्रणाली काम करते, ज्यामध्ये वस्तूची मागणी, साठा (Stock) आणि सेलरच्या ऑफर्सनुसार दर सतत बदलतात. मात्र, विक्रीचा आलेख वाढवण्यासाठी आधी किंमत फुगवून नंतर डिस्काउंटचा देखावा निर्माण केला जातो, हे विविध रिसर्चमधून सिद्ध झाले आहे.



सर्वच ऑफर्स खोट्या नसतात; 'या' श्रेणींमध्ये मिळतो खरा फायदा


येथे एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे की, ई-कॉमर्सवरील सर्वच ऑफर्स बनावट किंवा खोट्या नसतात. नवीन मॉडेल्स बाजारात आल्यानंतर जुना साठा (Stock Clear) लवकरात लवकर संपवण्यासाठी कंपन्या खरोखरच मोठे डिस्काउंट देतात. याशिवाय, बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर मिळणारे थेट कॅशबॅक आणि फेस्टिव्हल डील्समुळे स्मार्टफोन, लॅपटॉप, कपडे आणि घरगुती उपकरणांवर वर्षातील सर्वात कमी दर पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक ऑफरकडे संशयाने पाहण्याची गरज नसली, तरी सजग राहणे नक्कीच गरजेचे आहे.



ऑफर खरी की बनावट? 'या' मोफत टूल्सद्वारे मिनिटांत ओळखा


जर तुम्ही या सेलमध्ये एखादा महागडा स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा होम अप्लायन्सेस खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदीची बटणे दाबण्यापूर्वी त्या प्रॉडक्टची 'प्राइस हिस्ट्री' (Price History - किंमतीचा इतिहास) नक्की तपासा. यासाठी खालील मोफत ऑनलाइन टूल्स अत्यंत उपयुक्त ठरतात:


PriceDiff: या टूलवर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा किंवा अजियोवरील कोणत्याही प्रॉडक्टची लिंक पेस्ट करून, त्या वस्तूची गेल्या काही महिन्यांतील सर्वात कमी किंमत (Lowest Price) काय होती, हे सहज पाहता येते.


PriceTrail: हे टूल गेल्या ९० दिवसांतील वस्तूच्या किंमतींचा संपूर्ण आलेख दाखवते. तसेच सध्याचा दर खरोखरच कमी आहे की नाही, हे तपासून ग्राहकांना 'खरेदीची योग्य वेळ' (Great Time to Buy) किंवा 'काही दिवस थांबण्याचा' (Wait) स्पष्ट सल्ला देते.


Keepa आणि CamelCamelCamel: जर तुम्ही मुख्यत्वे ॲमेझॉनवरून खरेदी करत असाल, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या या टूल्सद्वारे तुम्ही वस्तूच्या किमतीच्या आलेखाचा अभ्यास करू शकता.



स्मार्ट शॉपिंगसाठी खरेदीपूर्वी 'या' ५ नियमांचे पालन करा:


१. किती टक्के ऑफ (Off) दिले आहे यापेक्षा वस्तूची प्रत्यक्ष सेलिंग प्राईज (Selling Price) काय आहे, यावर भर द्या.


२. प्रॉडक्टची लिंक प्राइस ट्रॅकर टूलमध्ये टाकून गेल्या काही आठवड्यांतील त्याचा दर तपासा.


३.बँक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि कूपन्सचा लाभ प्रत्येकालाच मिळेल असे नाही, त्यामुळे सर्व अटी वाचून अंतिम किंमत तपासा.


४. खूप आपत्कालीन खरेदी नसेल, तर प्राइस ट्रॅकिंग ॲप्सवर 'प्राइस अलर्ट' (Price Alert) सेट करा, जेणेकरून वस्तूचा दर आणखी कमी झाल्यास तुम्हाला मेसेज येईल.


५. मूळ छापील एमआरपीपेक्षा काही दिवसांपूर्वी ती वस्तू किती रुपयांना विकली जात होती, याच्याशी सध्याच्या दराची तुलना करा.

Comments
Add Comment

Ted Sarandos Meets PM Modi : Netflix ची भारतासाठी मोठी घोषणा! देश बनणार ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’; टेड सारंडोस यांनी घेतली PM मोदींची भेट

नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य

ONGC Russia Venezuela oil wells : कच्च्या तेलाच्या बाजारात भारताची मोठी झेप! व्हेनेझुएला अन् रशियातील तेल विहिरींवर आता ONGC चे वर्चस्व

नवी दिल्ली : जागतिक इंधन बाजारात आणि ऊर्जा क्षेत्रात भारताचा प्रभाव अधिक मजबूत करणारी एक अत्यंत महत्त्वाची

Resident Doctors Strike High Court Verdict : "काम नसेल तर पगार..."; संपावर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका!

मुंबई : होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (MMC) सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या

Phuket delhi air india flight Turbulence : हवेत अचानक लागला भीषण झटका अन् प्रवासी थेट छतावर आदळले! एअर इंडियाच्या विमानात ताणतणाव आणि किंचाळ्या; १७ जण जखमी

नवी दिल्ली : विमानातून प्रवास करताना "सीटबेल्ट बांधा" अशी सूचना मिळणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, मंगळवारी

Tarun Tejpal : मोठी बातमी! 'तहलका'चे संस्थापक तरुण तेजपाल यांना १० वर्षांचा तुरुंगवास

२०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! पणजी : प्रसिद्ध 'तहलका' मासिकाचे संस्थापक तरुण

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून