'हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही, हिंदूंचे सण दणक्यातच साजरे होणार’!

सांताक्रूझच्या शोभायात्रेत मंत्री नितेश राणे यांचा इशारा


मुंबई : "जर त्यांच्या भागात ईदला डीजे वाजत असेल, तर हनुमान जयंतीलाही तो दणक्यातच वाजेल. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही, हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदूंचा प्रत्येक सण येथे दणक्यातच साजरा होणार, हे सर्वांनी लक्षात ठेवावे," असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी दिला.





सांताक्रूझ-वाकोला येथील हनुमान मंदिर परिसरात श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी भगवान श्री हनुमानाच्या जयघोषाने आणि 'जय श्री राम'च्या घोषणांनी वाकोला परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेली ही शोभायात्रा अत्यंत उत्साहपूर्ण ठरली. मंत्री नितेश राणे यांनी स्वतः या यात्रेत सहभागी होऊन भाविकांचा उत्साह वाढवला. जागोजागी फुलांच्या वर्षावात या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी हिंदू सणांच्या उत्साहावर आडकाठी आणणाऱ्यांना कडक इशारा दिला.


मंत्री नितेश राणे म्हणाले की, "आपल्या सणांच्या वेळी नियमांवर बोट ठेवले जाते, मात्र आता तसे चालणार नाही. हिंदू समाज आपल्या परंपरा आणि उत्सव पूर्ण ताकदीने साजरे करेल. या देशात हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर झालाच पाहिजे", असेही त्यांनी सांगितले. या शोभायात्रेला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली