Dhurandhar 2 : 'धुरंधर २' मध्ये जेमतेम एक सेकंदाची भूमिका, तरीही सोशल मीडियात प्रचंड चर्चा

मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ अर्थात 'धुरंधर द रिव्हेंज' हा सिनेमा १९ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या सिनेमाचे वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन १४०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. सिनेमातील सगळ्याच कलाकारांना धुरंधर २ मुळे नवी ओळख मिळाली आहे. याच सिनेमात एका अभिनेत्रीने जेमतेम एका सेकंदाची भूमिका केली आहे. हा धुरंदर २ सिनेमातील सर्वात छोटा रोल म्हणता येईल. एवढ्या कमी लांबीची भूमिका करूनही या अभिनेत्रीची सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरू आहे.





'धुरंधर द रिव्हेंज' सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये अभिनेता रणवीर सिंह चार्टर्ड प्लेनमध्ये जातो. या विमानाच्या दाराजवळ काही क्षणांसाठी एक एअर होस्टेस दिसते. हे दृश्य सिनेमात जेमतेम एका सेकंदासाठी दिसते. यामुळे अनेकांना सुरुवातीला सिनेमा बघूनही ही अभिनेत्री लक्षात राहिली नव्हती. पण स्वतः या अभिनेत्रीने सीनची क्लीप इन्स्टावर शेअर केली आणि त्याला एक कॅप्शन दिली, 'धुरंधर २ मध्ये मला कोणी बघितलं का ?'


नियती पारीखची ही इन्स्टा पोस्ट व्हायरल झाली. दहा लाखांपेक्षा जास्त इन्स्टा युझरनी तिची इन्स्टा पोस्ट बघितली. यानंतर सोशल मीडियात नियतीची चर्चा सुरू झाली. काहींनी नियतीचं कौतुक केलं तर काही जणांनी तिला ट्रोल केलं. पण पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह प्रसिद्धी मिळणं महत्त्वाचं हे सूत्र डोक्यात ठेवून नियतीनं उत्साहानं निवडक ट्रोलरना छान प्रतिसाद दिला. छोट्या भूमिकेसाठी २२ लाख रुपये मिळाल्याचं तिनं एका ट्रोलरला सांगितलं.


नियतीचे इन्स्टावर तीन हजारांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. पण तिनं इन्स्टा पोस्ट केलेली धुरंधर २ ची क्लिप दहा लाखांपेक्षा जास्त इन्स्टा युझरनी बघितली आहे. तिच्या अकाऊंटवर धुरंधर सिनेमातील निवडक कलाकारांसोबतचे फोटो देखील आहेत.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग

Bhoot Bangla :अक्षय कुमार आणि एकता कपूरचा मोठा डाव! लवकरच बहुप्रतिक्षित ‘भूत बंगला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : ‘भूत बंगला’ (Bhoot Bangla) सिनेमाबाबतची उत्सुकता सातत्यानं वाढत आहे. याच्या रोचक झलक आणि गाजलेल्या गाण्यांनी आधीच

Hrithik Roshan Divorce : 'या' कारणामुळे हृतिक आणि सुझाननं घेतला घटस्फोट, अभिनेता जायेद खाननं केला खुलासा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच पुतण्याचा लग्नातील डानसमुळे चर्चेत आला होता. हृतिक

Sourav Ganguly Biopic : लवकरच 'सौरव गांगुली'चा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मुख्य भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित ‘दादा’ या बहुप्रतीक्षित

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत, पुण्यातील मावळच्या शेतकऱ्यानं केले गंभीर आरोप

मुंबई : अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali Bendre) आणि तिचे

Ramayana Teaser Release : हनुमान जयंती निमित्त 'श्री रामा'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : हनुमान जयंतीनिमित्त आज म्हणजेच गुरुवार २ एप्रिल २०२६ रोजी नितेश तिवारी दिग्दर्शित, नमित मल्होत्रा यांचं