Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन) विधेयक, २०२६’ बुधवारी (१ एप्रिल) लोकसभेत ध्वनिमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) पाठिंबा दिला. त्यामुळे अमरावती हीच राज्याची एकमेव आणि स्थायी राजधानी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


विधेयकावर चर्चा करताना काँग्रेसचे खासदार मणिकम टैगोर यांनी पक्षाचा पूर्ण पाठिंबा जाहीर करताना आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही केली. त्यांनी अमरावतीचा विकास बेंगलुरु, चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या महानगरांच्या धर्तीवर व्हावा, असे मत व्यक्त केले. तसेच विशाखापट्टणम, तिरुपती आणि कुरनूल यांचाही समतोल विकास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, टीडीपीचे खासदार आणि ग्रामीण विकास व संचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी या विधेयकाला सर्वानुमते मंजुरी देण्याचे आवाहन केले. या निर्णयामुळे आंध्र प्रदेशला स्थिर आणि निश्चित राजधानी मिळणार असून राज्याच्या विकासाला गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.


भाजपचे खासदार सी. एम. रमेश यांनी या विधेयकाचे समर्थन करताना सांगितले की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संसदेत अशा प्रकारचे विधेयक आणण्यात आले आहे, ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणाला राज्याची राजधानी म्हणून घोषित केले जात आहे. यामुळे भविष्यात राजधानीबाबत कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही आणि अमरावतीचा विकास वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी मागील सरकारच्या तीन राजधानींच्या प्रस्तावावर टीका करत तो निर्णय अव्यवहार्य असल्याचे म्हटले.


दुसरीकडे, वाईएसआर काँग्रेस पार्टी ने या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला. पक्षाचे खासदार पी. वी. मिथुन रेड्डी यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, अमरावतीसाठी सुमारे ३४ हजार एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्या वेळी शेतकऱ्यांना विकसित प्लॉट, घरकुल योजना आणि मुलांसाठी मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण आणि योग्य मोबदल्याची ठोस वेळमर्यादा ठरविल्याशिवाय या विधेयकाला अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या विधेयकाच्या मंजुरीमुळे अमरावतीला अधिकृतपणे आंध्र प्रदेशची कायमस्वरूपी राजधानी म्हणून मान्यता मिळाली असून राज्याच्या प्रशासकीय आणि आर्थिक स्थैर्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments
Add Comment

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील

BRICS : ब्रिक्स प्लस देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी 'न्यायनॉमिक्स' अन् 'न्याय सेतू'

नवी दिल्ली :  ११ व्या ‘ब्रिक्स प्लस लिगल फोरम’च्या उद्घाटनाप्रसंगी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

LPG Pipeline : देशातील सहा राज्यांमध्ये LPG पाइपलाइनचा विस्तार, केंद्राकडून ७ हजार कोटींची गुंतवणूक आणि १,८०० किमी नव्या पाइपलाइनला मंजुरी

नवी दिल्ली : देशातील एलपीजी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.