• सरकार पाडण्याचे 'दिवास्वप्न' पाहू नका : एकनाथ खडसे यांनी सरकार पडण्याबाबत केलेल्या विधानावर टीका करताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, "महायुती सरकार हे ५१ टक्के मते मिळवून सत्तेवर आले आहे. हे काही अल्पमतातले सरकार नाही. त्यामुळे खडसे साहेबांनी सरकार पडण्याच्या भ्रमात राहू नये. कायद्याच्या राज्यात गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा होईलच, पण अशा घटनांमुळे सरकार पडत नसते."
•राहुल गांधी,ममता बॅनर्जी आणि संजय राऊतांवर निशाणा : वंदे मातरम गाताना खुर्चीत बसून राहिल्याच्या कथित व्हिडिओवरून बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका केली. "त्यांच्यावर राष्ट्रगीताचे आणि वंदे मातरमचे संस्कारच नाहीत," असे ते म्हणाले. "संजय राऊत आजकाल काय बोलतात हे कोणीही गांभीर्याने ऐकत नाही, त्यामुळे त्यांच्या विधानांना मी महत्त्व देत नाही," अशा शब्दांत त्यांनी राऊतांना टोला लगावला. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, पराभवाच्या छायेत असलेल्या ममता बॅनर्जी आता सहानुभूती मिळवण्यासाठी ईव्हीएमवर खापर फोडण्याची तयारी करत आहेत.