LPG Price: व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या प्रमुख शहरांमधील दर

नवी दिल्ली: जागतिक तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी (१ एप्रिल, २०२६) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. १९-किलोग्रामच्या सिलिंडरच्या दरात अंदाजे २१८ रुपयाने वाढ झाली आहे. नवीन दर लागू झाल्यामुळे, देशभरातील प्रमुख शहरांमधील गॅसचे नवीन दरही कमी-अधिक प्रमाणात वाढीसह जाहीर करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये, १ एप्रिलपासून १९-किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता २०७८.५० रुपये झाली आहे. यापूर्वी, याच सिलिंडरची किंमत १८८३ रुपये होती, म्हणजेच १९५.५० रुपयांची वाढ झाली होती. मात्र, ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सध्या तरी कोणताही बदल झालेला नाही.



मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत किती होती?



मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत आजपासून २०३१ रुपयांपर्यंत वाढली आहे, जी पूर्वी १८३५ रुपये होती. म्हणजेच यात १९६ रुपयांची वाढ झाली आहे. कोलकातामध्ये १९ किलोच्या सिलेंडरची किंमत आजपासून २२०८ रुपयांपर्यंत वाढली आहे, जो पूर्वी १९९० रुपयांना उपलब्ध होता. म्हणजेच येथे सिलेंडर २१८ रुपयांनी महाग झाला आहे. त्याचप्रमाणे, चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत आजपासून २२४६.५० रुपयांपर्यंत वाढली आहे, जी पूर्वी २०४३.५० रुपये होती. म्हणजेच येथे २०३ रुपयांची वाढ झाली आहे.



मेट्रो शहरांमध्ये १९ किलो सिलेंडरची नवीन किंमत



दिल्ली - २०७८.५०
कोलकाता - २२०८.००
मुंबई - २०३१.००
चैन्नई - २२४६.५०



मार्चमध्ये किमतीही वाढल्या



यापूर्वी १ मार्च रोजी १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात ११४.५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती स्वयंपाकाच्या गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, कारण १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत त्याचा दर प्रति सिलेंडर ९१३ रुपये इतकाच आहे. घरगुती गॅसच्या दरात शेवटची वाढ ७ मार्च रोजी ६० रुपयांनी करण्यात आली होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजार मानके आणि डॉलर-रुपया विनिमय दराच्या आधारावर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एटीएफ आणि एलपीजीच्या दरात सुधारणा करतात.

Comments
Add Comment

Jammu-Kashmir: गांदरबलमध्ये रात्रभर झालेल्या चकमकीत १ दहशतवादी ठार

नवी दिल्ली: काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील अरहमा भागात मंगळवारी सुरू झालेली सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर