Dombivli : डोंबिवलीच्या रीलस्टारच्या घरात सापडला मोठा शस्त्रसाठा

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीच्या दावडी परिसरात राहणाऱ्या रीलस्टार सुरेंद्र पाटीलच्या घरातून कल्याण क्राइम ब्रँचने मोठा शस्त्रसाठा जप्त केला. खबरींनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी सुरेंद्र पाटीलच्या घरावर धाड टाकली आणि शस्त्रसाठा जप्त केला.


पोलिसांनी सुरेंद्र पाटीलच्या घरातून तीन देशी बनावटीच्या पिस्टल, एक सिक्सर रिव्हॅालवर, सात गावठी कट्टे, दोन एअर गन, ४०५ जिवंत काडतुसे, १६७ छर्रे, दोन तलवारी, तीन लोखंडी कोयते, एक सुरा, दोन चाकू, लोखंडी रॉड आणि तीन लाख वीस हजारांची रोकड जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाप्रकरणी सुरेंद्र पाटीलची कसून चौकशी सुरू आहे.


सुरेंद्र पाटील विरोधात बारा पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शस्त्र हाती घेऊन रील तयार करणारा सुरेंद्र परिसरात दहशत पसरवत होता. धक्कादायक म्हणजे डोंबिवली मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिका-याच्या खुर्चीवर बसून रील तयार केल्याचा गंभीर आरोप सुरेंद्रवर आहे. तसेच एका मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा देखील सुरेंद्रवर दाखल आहे. सध्या जामिनावर असलेला सुरेंद्र पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देण्यास अपयशी ठरला तर पुन्हा कोठडीत जाण्याची शक्यता आहे.


सुरेंद्रने घरात चप्पल-बूट ठेवण्याच्या स्टँडमध्ये एक मोठा गुप्त कप्पा केला होता. या कप्प्यात तो शस्त्रसाठा ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीआधारे तपासणी केल्यावर घरात मोठा शस्त्रसाठा आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.


ताज्या घडामोडींमुळे सुरेंद्र आणि त्याच्या संपर्कात असलेल्या सर्व व्यक्ती या पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. रीलस्टारच्या घरात सापडलेल्या शस्त्र साठ्याप्रकरणी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही

Chandigarh Blast : भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट, पोलीस घटनास्थळी

चंदिगड : चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला.

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

जळगाव : सोन्याचा भाव दीड लाखांच्या उंबरठ्यावर

गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढले चांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढ जळगाव : सोन्या-चांदीच्या

केळीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी वर्ग हवालदिल

जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची

पुणे - वाहन क्रमांक आरक्षणासाठी २ एप्रिलपासून फेसलेस सेवा सुरू

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची