Chandigarh Blast : भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट, पोलीस घटनास्थळी

चंदिगड : चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाची माहिती कळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात दहशत पसरली. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झालेली नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या स्फोटामुळे जीवितहानी झालेली नाही पण परिसरात भीतीचे वातावरण आहे. काही वाहनांचे कमी - जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांना अफवा पसरवू नका असे आवाहन करण्यात आले आहे. स्फोट प्रकरणी तपास सुरू आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांचा या घटनेशी काही संबंध आहे का याची पण तपासणी सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. खबरींचीही मदत घेतली जात आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत