Land surveyors : भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती

मुंबई : राज्यातील भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेत झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर बुधवारी ( दि. १ एप्रिल ) शिक्कामोर्तब करण्यात आले.


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने भूमि अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. यामुळे विभागातील पदरचना आणि वेतनश्रेणीत मोठे बदल होणार आहेत. विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार एकूण १०,६८३ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ९,६३८ नियमित पदे असून १०४५ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यामुळे विभागाच्या कामकाजात गती येणार असून जमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होईल.


भूकरमापक पदाचे शैक्षणिक स्वरूप आणि कामाची व्याप्ती लक्षात घेऊन त्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता भूकरमापकांना एस-६ ऐवजी एस-८ ही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.


* पदोन्नतीसाठी नवीन संवर्गाची निर्मिती या सुधारित निर्णयानुसार, 'भूकरमापक' हा संवर्ग आता 'मृत संवर्ग' म्हणून घोषित करण्यात आला आहे. याचा अर्थ, भविष्यात या पदावर थेट भरती होणार नाही. त्याऐवजी 'परिरक्षण भूमापक' हे पद नियुक्तीचे प्रथम स्तर असेल. तसेच, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळावी यासाठी 'परिरक्षण भूमापक (निवड श्रेणी)' हा नवीन संवर्ग निर्माण करण्यात येणार आहे.


* महत्त्वाचे बदल:
* प्रथम स्तर : परिरक्षण भूमापक हा आता नियुक्तीचा प्राथमिक स्तर असेल.
* निवड श्रेणी : अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी परिरक्षण भूमापक ( निवड श्रेणी ) ही नवी पदे निर्माण होणार.
* पदोन्नतीचा मार्ग : परिरक्षण भूमापक (निवड श्रेणी) या संवर्गातून आता थेट 'शिरस्तेदार' संवर्गात पदोन्नती मिळणे शक्य होणार आहे.
* नियम बदल : नवीन पदभरती आणि पदोन्नतीसाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

Rejuvenation of rivers : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य

आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी' मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस

Navsari : नवसारी येथे असलेल्या उभारणार भव्य क्रीडा संकुल

मुंबई : अमरावती शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज

जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग, अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ - कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

मुघल, इंग्रज आणि तत्कालीन काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा नीतीमुळेच हिंदू विभागले : मंत्री लोढा यांचा

Agriculture Minister Dattatray Bharne : अनुदानित रासायनिक खतांचे वितरण आता ‘फार्मर आयडी’वर होणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

अग्रीस्टॅक फार्मर आयडी चा वापर करून महाराष्ट्रात देशातील पहिला पायलट प्रकल्प मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना