Agriculture Minister Dattatray Bharne : अनुदानित रासायनिक खतांचे वितरण आता ‘फार्मर आयडी’वर होणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

अग्रीस्टॅक फार्मर आयडी चा वापर करून महाराष्ट्रात देशातील पहिला पायलट प्रकल्प


मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आता ‘फार्मर आयडी’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


केंद्रीय कृषी मंत्री शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली फार्मर आयडीसह इतर विषयांवर ऑनलाईन बैठकीप्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली. अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीचा वापर करून देशातील पहिला पायलट प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.


या उपक्रमामुळे खतांचे वितरण अधिक नियोजनबद्ध, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने होणार असून, शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ थेट आणि योग्य पद्धतीने मिळणार आहे. तसेच बनावट व्यवहारांना आळा बसून प्रणाली अधिक विश्वासार्ह होणार आहे, अशी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली


दरम्यान, या बैठकीत महाराष्ट्रात अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सर्वाधिक प्रमाणात फार्मर आयडी तयार करण्यात आल्याबद्दल केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अभिनंदन केले. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ चार दिवसांत सर्वाधिक निधीचे वितरण करण्यात आल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.


केंद्रीय मंत्री चौहान यांनी पुढील काळात सर्व योजनांमध्ये फार्मर आयडीचा वापर वाढविण्याच्या सूचना दिल्या असून, महाराष्ट्राचा हा उपक्रम इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई

BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु https://prahaar.in/2026/08/14/46-trees-affected-by-the-redevelopment-of-ramabai-and-kamraj-nagar-in-ghatkopar-mmrda-to-plant-955-trees/ मुंबई (विशेष

MMRDA : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरच्या पुनर्विकासात ४६ झाडे बाधित; एमएमआरडीएकडून ९५५ झाडे लावून घेतली जाणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरमधील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी हाती घेण्यात

Train MegaBlock : पश्चिम रेल्वेचा वीकेंडला बोरिवली-भाईंदर दरम्यान जंबो ब्लॉक; गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर

मुंबई:

BMC NEWS : मुंबई-३ जलवाहिनीला ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी गळती; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ३००० मिलीमीटर