Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डचे लोकार्पण

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘RuPay On-The-Go’, NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.


यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक श्री. रमेश ढावरे, तसेच सवलतधारक महिला संगिता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते NCMC स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न NCMC स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे.


सदर योजनेची अंमलबजावणी M/s. E-Infochips Technologies Ltd. आणि NSDL Payments Bank यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असून, राज्यातील सर्व आगार व बसस्थानकांवर नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय, सुमारे ३ हजार अधिकृत केंद्रांवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


या स्मार्ट कार्डद्वारे प्रवाशांना वॉलेट टॉप-अपची सुविधा उपलब्ध राहणार असून, किमान ₹१०० पासून टॉप-अप करता येणार आहे. कार्डधारकांना बसमधील ईटीआयएम मशीन, संकेतस्थळ, मोबाईल ॲप तसेच अधिकृत एजंटमार्फत टॉप-अप करता येईल. नवीन NCMC कार्डची किंमत १९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.


यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "राज्याच्या एसटीसारख्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत डिजिटल क्रांती घडवून आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे प्रवाशांना सुलभ, सुरक्षित व पारदर्शक सेवा मिळेल आणि एसटी महामंडळाच्या कामकाजातही अधिक कार्यक्षमतेने सुधारणा होईल."


या उपक्रमामुळे राज्यातील लाखो सवलतधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, एसटीच्या सेवांचा वापर अधिक सोयीस्कर व आधुनिक पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

Comments
Add Comment

Ritu Tawde : तुमच्या घरात आयाबहिणी नाहीत का? मुंबईच्या महापाैर रितू तावडे कडाडल्या, सरळ म्हणाल्या...

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या घशाच्या आजाराबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय

Proposal for Bridge and Road Widening: मालाड पश्चिमेतील पुल आणि रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव सुमारे २५ टक्के उणे दरात

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीची सत्ता आल्यानंतर

Ashwini Bhide: मुंबई महापालिका आयुक्तपदी आश्विनी भिडे याच का हव्या होत्या? काय आहे कारण..

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर सोमवारी रात्री अर्धा पडदा

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: भगवान महावीरांनी शांतीचा आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. सेवाकार्यात नेहमीच अग्रेसर राहून जैन समाजाने

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे