सोशल मीडियावर ओळख अन् शाळेतून पळवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नागपूर : सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखी या अत्यंत भयानक रूप घेऊ शकतात, याचा प्रत्यय या नागपूरच्या घटनेमधून स्पष्ट होत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा चांगला जरी असला तरी त्याचे तोटे ही तितकेच वाईट आणि भयानक आहेत. नागपुरात अशाच सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही नागपूर शहरातील सिव्हिल लाईन्स हा भागात राहत असून एका नामांकित शाळेत शिक्षण होती. या प्रकरणातील आरोपी करण केशव केशी ( वय २८ ) हा टाईल्स फिटिंगचे काम करतो. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढले.



हॉटेल मध्ये नेऊन ...


त्यानंतर १८ मार्च आणि १७ मार्च या दोन दिवशी आरोपीने पीडितेला शाळेच्या गेटवरून फूस लावून पळवून नेले. ओळख पटू नये म्हणून शाळेचा गणवेश काढून सार्वजनिक सुलभमध्ये तिला कपडे बदलण्यास सांगितले. नागपुरातील फ्रेंड्स कॉलनीतील एका हॉटेलमध्ये नेऊन दुसऱ्याच मुलीचे आधारकार्ड दाखवत रूम बुक केली आणि तिच्यावर अत्याचार केला.


आपला सोशल मीडियावरचा चांगला मित्र समजून अल्पवयीन मुलगी या तरुणासोबत गेली होती. परंतु आरोपीने जेव्हा तिला स्पर्श करायला सुरुवात केली तेव्हा तिने या गोष्टीला विरोध करताच आरोपीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.



मुलगी शाळेत सतत गैरहजर असल्याचे पालकांना मेसेज


मुलगी शाळेत अनुपस्थित असल्याचे मेसेज पालकांना मिळत होते. मुलीच्या वागण्यातील बदल आणि शाळेतल्या तिच्या दांड्या यावरून आई बाबांनी विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला.



पोलीस तपास


या प्रकारणानंतर पालकांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सदर पोलिसांनी आपली चक्र फिरवत आरोपी केशी याला बेड्या ठोकल्या.


सोशल मीडियाचा वापर हा किती भयानक ठरू शकतो. हे या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांना फोन देण्यासोबतच आपली मुलं सोशल मीडियाचा गैरवापर तर करत नाहीत ना? याकडे ही लक्ष द्यायला हवे. या घटनेवरून सोशल मीडियाचा वापर आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



Comments
Add Comment

अश्विनी भिडेंनी BMC आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते

राज्यात १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी १० वरिष्ठ सनदी

'Dunagiri' Warship : स्वदेशी ‘स्टेल्थ फ्रिगेट’ तंत्रज्ञानाने बांधणी केलेली ‘दुनागिरी’ युध्दनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द

युद्धनौका निर्मितीमध्ये आत्मनिर्भरतेला मोठी चालना मुंबई : गार्डन रीच शिपबिल्डिंग अँड इंजिनिअर्स लिमिटेड

मुंबईत वीज दरात कपात; एप्रिल २०२६ पासून ग्राहकांना मोठा दिलासा

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पावर आणि अदानी

नवीन आयकर कायदा आणि अनेक अर्थसंकल्पीय तरतुदी १ एप्रिलपासून होणार लागू

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीबरोबरच, देशाच्या आयकर रचनेतही १ एप्रिलपासून मोठे बदल होणार

Navnath Ban : मतदारांनी नाकारल्यामुळे संजय राऊत, उबाठा गट नामर्द बनल भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : १४० कोटी भारतीय नेभळट आणि भ्याड नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व जनतेच्या