bmc commissioner : अश्विनी भिडेंनी BMC आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेल्या अश्विनी भिडे या पहिल्या महिला सनदी अधिकारी आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते.


अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्‍या तुकडीतील अधिकारी असून त्‍यांना सनदी सेवेचा सुमारे ३१ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्‍ट्रात विविध महत्‍त्‍वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्‍या अतिरिक्त विभागीय आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासनामध्‍ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त महानगर आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्‍या सचिव, माननीय मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव म्‍हणून श्रीमती आश्विनी भिडे यांनी काम पाहिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्हणून त्‍यांनी मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्‍यात महत्‍त्‍वाचे योगदान दिले आहे. याआधी अश्विनी भिडेंनी मुंबई महापालिकेत ९ मे २०२० ते १९ मार्च २०२४ या कालावधीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर काम केले आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये देखील त्यांचे मोठे योगदान आहे. विविध ठिकाणी विविध पदांवर असताना केलेल्‍या उल्लेखनीय कार्यांबद्दल त्‍यांना विविध संस्था-संघटनांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

CM Devendra Fadnavis : मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट)

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल