Shahrukh Khan's King Movie : आखाती देशातील युद्धाचा बॉलीवुडलाही फटका; शाहरुखच्या 'किंग'मधील ॲक्शन सीक्वेन्समध्ये बदल

- दुबईऐवजी मुंबईत होणार चित्रीकरण


मुंबई : आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता चित्रपट सृष्टीवरही होताना दिसत आहे. नुकताच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'किंग' चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. त्या माहितीनुसार किंग चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्समध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वे हे ॲक्शन सीक्वेन्स दुबईमध्ये चित्रित होणार होते, मात्र आता ते मुंबईमध्येच चित्रित होणार असल्याचे दिग्दर्शाने सांगितले आहे.


मिळालेल्या वृत्तानुसार, सुहाना खान आणि अनिल कपूर अभिनीत चित्रपटातील एका भव्य ॲक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण दुबईमध्ये होणार होते. मात्र, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे हे आंतरराष्ट्रीय चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. हे चित्रीकरण ९ एप्रिल रोजी सुरू होऊन आठवडाभर चालणार होते आणि त्यासाठी सर्व आवश्यक परवानग्याही घेण्यात आल्या होत्या.


मात्र सध्याची परिस्थिती पाहता, निर्मात्यांनी कलाकार आणि तांत्रिक टीमच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेतला आहे. आता एक्शन सिक्वेन्सचे चित्रीकरण मुंबईत केले जाईल. दुबईसारखे व्हिज्युअल इफेक्ट्स साधण्यासाठी विले पार्ले येथील एका स्टुडिओमध्ये वाळवंटासारखे वातावरण तयार केले जात आहे.


'किंग' या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ आणि जयदीप अहलावत यांच्यासह इतर मोठे कलाकार दिसणार आहेत. भव्य निर्मिती असलेला हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे.


डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डंकी'नंतर, हा शाहरुखचा पुढचा मोठा चित्रपट असेल आणि प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट ख्रिसमस २०२६ रोजी प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे, सुहाना खान पहिल्यांदाच तिचे वडील शाहरुख खान यांच्यासोबत पडद्यावर दिसणार आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 Box Office Collection Day 12 : बॉक्स ऑफिसवर 'धुरंदर २ चं' वादळ! KGF २ च्या विक्रमांना लोळवत ९०० कोटींच्या उंबरठ्यावर!

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या आपल्या 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटामुळे चर्चेच्या

Persimmon of My Love : पहिला रशियन सिनेमा ज्यात खच्चून भरलाय बॉलिवूडचा मसाला

नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार

Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि