Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीSuhana Khan King Film: सुहाना खानच्या ‘किंग’साठी शाहरूखने गुंतवले कोट्यवधी रुपये

Suhana Khan King Film: सुहाना खानच्या ‘किंग’साठी शाहरूखने गुंतवले कोट्यवधी रुपये

मुंबई : ‘पठाण’(Pathaan), ‘जवान’ (Jawan) आणि ‘डंकी’ (Dunki) या सिनेमांनंतर अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) ‘किंग’ या सिनेमातून पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२५ मध्ये रिलीज होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहेत. या सिनेमातून शाहरुखची लेक सुहाना सुद्धा मोठ्या स्क्रीनवर पदार्पण करत आहे. सध्या या सिनेमाच्या शूटिंगची पूर्वतयारी सुरु असून हा सिनेमा उत्तम बनावा म्हणून सिनेमाची टीम जोरदार तयारी करत आहे.

सुहाना खान हिचा गेल्या वर्षी ‘द आर्चीज’ हा चित्रपट रिलीज झालेला होता. या चित्रपटातून तिने ओटीटी विश्वात डेब्यू केलं होतं. आता लवकरच सुहाना खान ‘किंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार डेब्यू करणार आहे. अशातच तिच्या चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित ‘किंग’ चित्रपटासाठी शाहरूखने तब्बल २०० कोटींची गुंतवणूक केल्याचे बोलले जात आहे.

एका वृत्तवाहिनीनुसार सिद्धार्थ आनंद आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट किंग या सिनेमाची निर्मिती करत आहेत. हा सिनेमा अ‍ॅक्शन आणि ड्रामाने पुरेपूर भरलेला असून इंडस्ट्रीत एक अ‍ॅक्शनपटांसाठी एक वेगळं उदाहरण तयार करण्याचा प्रयत्न या सिनेमातून होणार आहे. खास परदेशातील स्टंट दिग्दर्शक या सिनेमासाठी बोलावले असून उत्तम व्हीएफएक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान या सिनेमासाठी वापरलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे. येत्या मे महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून पाच महिने या सिनेमाचं शूटिंग सुरु राहणार आहे.

दरम्यान, या सिनेमाबाबत शाहरुख किंवा सुहानाने कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. तसेच सिनेमाच्या टीमकडून सुद्धा याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र लेकीच्या मोठ्या स्क्रीनवरील पदार्पणासाठी शाहरुख खूप जास्त मेहनत घेत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. २०२५ च्या अखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -