Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील भांडणं, टास्क, हेवेदावे आणि चढाओढ यामुळे बीग बॉस मराठी ६ सीझन चांगलाच गाजला पण त्याहीपेक्षा जास्त बाहेर आल्यानंतर बिग बॉस स्पर्धकांनी केलेल्या दाव्यावरून मोठी खळबळ उडाली होती.


बिग बॉस मराठी ६ सीझनचे आता काही दिवसच बाकी राहिले असून बिग बॉस आता अंतिम टप्प्यात आलं आहे. आशातच फिनाले जवळ आलं असताना स्पर्धकांमध्ये
टिकिट टू फिनालेसाठी चुरस वाढली आहे. नुकताच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळणार आहे. या टास्कमुळे बिग बॉसच्या घरातील २ स्पर्धकांमधला वाद इतका वाढतो की तो हाणामारीपर्यंत पोहचतो. या दोघांवर बिग बॉसही संतापले.


बिग बॉसने घरातील सदस्यांना या आठवड्यात एक वेगळा टास्क दिला. त्यानुसार स्पर्धकांना एखाद्या सदस्याचा टीव्ही फोडायचा होता. ज्या सदस्याचा टीव्ही फुटेल त्या सदस्याचं फिनालेमध्ये जाण्याचं स्वप्न तुटणार आहे.


हा टास्क करताना राकेशनं विशालला नॉमिनेट करत त्याचा टीव्ही फोडला. त्यावेळी राकेश म्हणाला, "माझं नावं आहे विशाल. पर्सनल लाइफबद्दल बोलणं मला चुकीचं वाटलं" राकेशच्या निर्णयानंतर विशाल चांगलाच संतापला. तो म्हणाला, "तू माझ्या एजबद्दल बोलतोस ते पर्सनल नाहीये का? डिवोर्स का झाला?" या वक्तव्यामुळे दोघांमधला वाद अधिकच वाढला. यानंतर राकेश बाहेर येत विशालसोबत जोरदार भांडण करतो. डिवोर्स का काढतोस ? असा सवाल करत तो विशालवर संतापतो. त्यावर विशालही मागे न हटता म्हणतो "तू का काढतोस?" या दोघांमधील वाद इतका वाढतो की ते एकमेकांच्या अंगावर धावून जातात. काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हं दिसू लागतात. दोघांमधील वाढता वाद पाहून घरातील इतर सदस्य लगेच मध्ये पडतात आणि त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. सर्वजण मिळून त्यांचं भांडण सोडवतात. यावेळी बिग बॉसच्या घरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं असतं.


दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बिग बॉस तात्काळ हस्तक्षेप करतात. ते कडक शब्दांत आदेश देतात. "राकेश आणि विशाल, लांब व्हा." या आदेशानंतर दोघांनाही वेगळं करण्यात येतं बिग बॉसच्या घरात आता पुढे काय घडणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये