Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावावर मुंबईत गुन्हा दाखल, मोठी माहिती समोर

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले असून, मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीची दखल घेत कफ परेड पोलिसांनी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.



नेमके प्रकरण काय?


मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सजेंडरच्या भावविरोधातच कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधित ट्रान्सजेंडर व्यक्तीने नरहरी झिरवळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनात (FDA) नोकरी लावून देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यास त्यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती, असा गंभीर आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मूळ स्वरूपात नसून तो जाणीवपूर्वक 'एडिट' करून किंवा त्यात तांत्रिक बदल करून पसरवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कफ परेड पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७९ नुसार कोणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावून त्यांच्या गोपनीयतेचा भंग करणे आणि विनयभंग करणे, तसेच कलम ३५१(१) अंतर्गत गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासोबतच, डिजिटल माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून बदनामीकारक मजकूर आणि छेडछाड केलेले व्हिडिओ पसरवल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. तपासाअंती यातील दोषींवर कडक कारवाई होण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.



व्हिडिओ एडिट करून बदनामीचा प्रयत्न


या प्रकरणावर स्वतः नरहरी झिरवळ यांनी आपली बाजू मांडली आहे. "हा व्हिडिओ मूळ स्वरूपात नसून दोन-तीन वेगळे व्हिडिओ एकत्र जोडून (Edit करून) माझी बदनामी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हा व्हिडिओ बनावट असल्याचे त्यांचे म्हणणे असून, राजकीय हेतूने आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, "नरहरी झिरवळ यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा आणि तो जाणीवपूर्वक जोडून तयार केल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओची तांत्रिक शहानिशा केली जाईल आणि त्याची सत्यता तपासली जाईल. जर हा व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले, तर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. मात्र, सत्य समोर आल्याशिवाय कोणताही घाईघाईने निर्णय घेतला जाणार नाही." सध्या या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही. कफ परेड पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. व्हिडिओ खरंच छेडछाड केलेला आहे की त्यामागे काही वेगळे तथ्य आहे, हे आता पोलीस तपासातच स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

मेट्रो वूमन, कोस्टल वूमन ते पहिल्या मुंबई महापालिका आयुक्त

मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो व्हूमन.

CSKvsRR : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने चेन्नई विरोधात राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात सोमवारी

मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित

पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान; फडणवीस-शिंदे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब मुंबई : गेल्या काही दिवसांपासून

यापुढे महापालिकेत ५० खोक्यांची भाषा करणाऱ्यांना मिळणार ५० ठोसे

अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांना आता सभागृहाबाहेरचा रस्ता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात

विरोधी पक्षनेत्यांचा पुन्हा एकदा कांगावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना सध्या कोणत्याही मुद्दयावर आपली भूमिका

महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीवर १३ सदस्यांची नियुक्ती जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर निवडून आलेल्या विविध पक्षांच्या १३ सदस्यांची