Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल-वीज प्रकल्प आणि खार्ग बेट उद्ध्वस्त करू - डोनाल्ड ट्रम्प

इराणसोबत चर्चेचे दावे सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला (Iran-US-Israel War) त्याच्या तेलसाठ्यांवर आणि वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ खुली करावी, अन्यथा अमेरिका इराणचे वीज निर्मिती प्रकल्प, तेलाचे विहिरी आणि खार्ग बेट उध्वस्त करून पूर्णपणे नष्ट करेल.


ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले की, “अमेरिका इराणमधील (Iran-US-Israel War) आपले लष्करी अभियान समाप्त करण्यासाठी नव्या आणि अधिक शहाण्या शासनासोबत गंभीर चर्चा करत आहे. या चर्चेत लक्षणीय प्रगती झाली आहे. मात्र, कोणत्याही कारणामुळे लवकर करार झाला नाही जरी तो होण्याची शक्यता आहे आणि जर होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ व्यापारासाठी खुली करण्यात आली नाही, तर आम्ही इराणमधील आमची उपस्थिती त्यांच्या सर्व वीज निर्मिती केंद्रांवर, तेलाच्या विहिरींवर आणि खार्ग बेटावर हल्ले करून पूर्णतः संपवू.” ट्रम्प यांनी पुढे म्हटले, “हे आमच्या त्या अनेक सैनिकांचा आणि इतर लोकांचा बदला असेल, ज्यांची इराणने मागील ४७ वर्षांच्या तथाकथित दहशतीच्या राजवटीत निर्दयपणे हत्या केली.”


दरम्यान, इराणने अमेरिकन आणि इस्रायली (Iran-US-Israel War) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फिकारी यांनी सांगितले की, अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांची घरे आता वैध लक्ष्य मानली जाऊ शकतात.


अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यातील तणाव सतत वाढत असून हा संघर्ष आता ३१व्या दिवसात प्रवेश केला आहे. दोन्ही बाजूंपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. मात्र, ट्रम्प यांचा दावा आहे की इराणसोबत चर्चा सुरू असून लवकरच काही तोडगा निघू शकतो.


इराणने (Iran-US-Israel War) स्पष्ट केले आहे की, ते अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत; मात्र अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचा (NPT) भाग राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा पर्याय ते तपासत आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी म्हटले की, “इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाने कधीही अण्वस्त्रे मिळवण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही आणि असा कोणताही प्रयत्नही केलेला नाही.”

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : इराणकडून पाकिस्तानच्या प्रस्तावाला केराची टोपली

पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

Middle East Conflict: अमेरिकेने इराणच्या इस्फहानवर टाकले बंकर-बस्टर बॉम्ब; ट्रम्प यांच्याकडून धक्कादायक व्हिडिओ शेअर

नवी दिल्ली: अमेरिकेच्या लष्कराने इराणमधील इस्फहान येथील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामाला लक्ष्य केले. या

Jaish-e-Mohammed : दहशतवादी जगतात खळबळ! मसूद अझरच्या मोठ्या भावाचा गूढ मृत्यू

- जैश-ए-मोहम्मदचा कणा ढासळला? मुंबई : पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख चेहरा मसूद अझर याचा

Iran-US-Israel War : समुद्रात भीषण हल्ला! दुबईतील तेलवाहू जहाजावर इराणकडून मोठा हल्ला

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाने (Iran-US-Israel War) आता आणखी धोकादायक वळण घेतले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील

संयुक्त राष्ट्राचे राजनयिक मोहम्मद सफा यांनी दिला राजीनामा; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे, ज्यामुळे