Jaish-e-Mohammed : दहशतवादी जगतात खळबळ! मसूद अझरच्या मोठ्या भावाचा गूढ मृत्यू

- जैश-ए-मोहम्मदचा कणा ढासळला?


मुंबई : पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख चेहरा मसूद अझर याचा मोठा भाऊ ताहिर अन्वर याच्या आकस्मिक मृत्यूने दहशतवादी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट नसल्याने गूढ अधिकच वाढले आहे.


अहवालांनुसार, ताहिर अन्वर हा केवळ एक सदस्य नव्हता, तर ‘जैश’च्या अनेक मोठ्या कारवायांच्या पडद्यामागील मुख्य सूत्रधार होता. तो मसूद अझरचा विश्वासू सल्लागार आणि संपर्क अधिकारी म्हणून काम करत होता. संघटनेच्या दहशतवादी योजना तयार करणे, त्यांची अंमलबजावणी आणि समन्वय साधणे ही महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती.


११ भावंडांमध्ये सर्वात मोठा असलेला ताहिर सुरुवातीला पाकिस्तानात कुक्कुटपालन व्यवसाय करत होता. मात्र २००० नंतर त्याने दहशतवादाच्या मार्गावर पाऊल ठेवले. त्याच वर्षी त्याने आपल्या धाकट्या भावासोबत जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली आणि संघटनेच्या लष्करी कारवायांचे नेतृत्व केले.


भरती, प्रशिक्षण आणि नवीन दहशतवादी शिबिरांची उभारणी या सर्व गोष्टींमध्ये ताहिरची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, तो नेहमीच पडद्यामागे राहिला. मसूद अझर जिथे आघाडीवर दिसत होता, तिथे ताहिर शांतपणे संपूर्ण यंत्रणा सांभाळत होता. संघटनेच्या मुख्यालयातूनच तो या कारवाया नियंत्रित करत असे.


मसूद अझर स्वतः ताहिरला संघटनेचा ‘कणा’ मानत होता. त्यामुळेच त्याच्या मृत्यूने ‘जैश’ची ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे, तर संघटनेत नेतृत्वासाठी अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.





विशेष म्हणजे, काही अहवालांनुसार ऑपरेशन सिंदूरनंतर ताहिरच्या उपस्थितीत संघटनेच्या मुख्यालयातून ‘जमात-उन-मोमिनात’ या महिला दहशतवादी शाखेची स्थापना करण्यात आली होती. या शाखेच्या प्रशिक्षणामध्येही ताहिरची मोठी भूमिका होती.


एकूणच, ताहिर अन्वरच्या मृत्यूमुळे जैश-ए-मोहम्मदसमोर मोठे नेतृत्व संकट उभे राहण्याची शक्यता असून, पुढील काळात या संघटनेतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी